October 2025

अहमदनगर जिल्ह्यातील लोकल क्राईम ब्रँच (LCB) विभागावर गंभीर आरोप होत आहेत. इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अस्लम आवद बिनसाद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रार अर्जातून या विभागातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.तक्रारीत नमूद केलं आहे की, अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि राहुरी परिसरातील काही ठिकाणी LCB पथकाकडून अवैध व्यवसाय, दारू विक्री, मटका-जुगार, अमली पदार्थांचा व्यवहार आणि काही भंगार विक्रेत्यांना संरक्षण दिलं जात असल्याच्या चर्चा जोरात आहेत.

पत्रकार संघटनेने या संदर्भात स्पष्ट म्हटलं आहे की

LCB चे काम गुन्हे उघड करणं आहे; पण काही ठिकाणी गुन्हेगारांचं रक्षण करणं दिसतंय. हा विभाग जनतेसाठी भयावह नव्हे, सुरक्षिततेचा आधार व्हायला हवा.”

यासोबतच तक्रारीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अतिरेक आणि दबावाच्या वागणुकीबद्दलही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिक आणि प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं नमूद आहे.

पत्रकार संघटनेच्या तक्रारीत आणखी एक मुद्दा ठळक करण्यात आला आहे —

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईचं धोरण राबवलं होतं, पण अलीकडे पुन्हा त्याच धंद्यांना खतपाणी मिळत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पत्रकार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि पारदर्शक कार्यपद्धती राबविण्याची मागणी केली आहे.


बेलापूर (प्रतिनिधी)-अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या गावकरी पतसंस्थेचा कारभार काटकसरीने करुन पतसंस्थेत जास्तीत जास्त ठेवी गोळा करुन कर्ज वसुली लाही प्राधान्य देणार असल्याचे मत गावकरी पतसंस्थेचे नुतन चेअरमन अभिषेक खंडागळे यांनी व्यक्त केले.                                 येथील गावकरी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व बेलापूरचे माजी उपसरपंच अभिषेक पाटील खंडागळे यांची निवड झाली त्याबद्दल सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.या वेळी पत्रकार देविदास देसाई विष्णुपंत डावरे,मयूर साळूंके, प्रफुल्ल काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संजय भोंडगे,मेजर किरण शेलार,बाबुलाल पठाण,दिपक क्षत्रिय,पुंजाहरी सुपेकर, विलास नागले, भगीरथ मुंडलिक,किरण गागरे, रविंद्र कर्पे, महेश जेठवा,विशाल आंबेकर, राधेश्याम अंबिलवादे,दिलीप अमोलिक, बाबासाहेब काळे,सचिन वाघ,संदीप सोनवणे,महेश कुऱ्हे,सचिन देवरे, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, मच्छिंद्र खोसे आदी उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी)- येथील करून ऋषिकेश साहेबराव वाबळे याची दक्षिण आफ्रिकेतील डरबान शहराजवळ जवळील केप टाऊन येथे साखर कारखान्याच्या व्यवस्थापना संबंधित सॉफ्टवेअर तयार करण्याचे व  अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य करण्याकरता निवड झाली असून त्याच्या या निवडीमुळे श्रीरामपूर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा असा वर्षोव होत आहे                               बेलापूर येथील ऋषिकेश वाबळे हे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेबराव रामराव वाबळे यांचे चिरंजीव आहेत .त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेलापूर येथील जेठाभाई ठाकरशी सोमय्या हायस्कूल येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी एमआयटी कॉलेज पुणे येथून बी टेक एम बी ए ॲग्री अँड फूड मॅनेजमेंट पदव्या संपादन केल्या शिक्षणाच्या काळात त्यांनी साखर उद्योग आणि कृषी व्यवस्थापन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले आपल्या वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी कठोर मेहनत घेऊन शिक्षण व कौशल्याच्या जोरावर थेट परदेशात आपली छाप उमठविली आहे .याप्रसंगी अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे, आमदार हेमंत ओगले, अरुण पाटील नाईक ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी सरपंच भरत साळुंके ,बाळासाहेब भांड,खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, संजय गोरे ,लहान भाऊ नागले ,अशोक राशिनकर, बाजार समितीचे सर्व संचालक सभासद व व्यापारी वर्गांनी ऋषिकेश वाबळे त्याचबरोबर सचिव साहेबराव वाबळे यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. बेलापूरच्या मातीतून घडलेल्या ऋषिकेश वाबळे यांनी आज जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करुन दिली आहे .

गेली वीस-बावीस वर्षांपासून उक्कलगाव गणातील कार्यक्षेत्रात उक्कलगाव गळनिंब एकलहरे कुरणपूर फत्याबाद मांडवे कडीत खंडाळा चांडेवाडी तांबेवाडी यादी भागात सामाजिक कामात कार्यरत असून व नात्यागोत्याचा मोठा जाळं मित्रपरिवार मोठा असून या परिसरातील सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवण्याचे काम प्रभावीपणे केले असून उक्कलगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी असे सर्व सामान्यांचे आग्रही भूमिका व लागेल ती मदत करणार असल्याचे  ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणारच असल्याचे संदीप शेरमाळे यांनी सांगितले.

   कडीत बुद्रुक, कडीत खुर्द, मांडवे, तांबेवाडी,फत्याबाद, चांडेवाडी, कुरणपूर, गळनिंब, उक्कलगाव, एकलहरे, आठवाडी, जवाहरवाडी, यादी परिसरात अनेक प्रश्न त्यामध्ये 

वीज, पिण्याचे पाणी,बिबट्या कडून हल्ल्या, हॉस्पिटलचे प्रश्न, बांधकाम कामगार, रस्ते, रेशनचे, त्याचबरोबर संजय गांधी निराधार, अपंग, एकल महिला, बालसंगोपन प्रकरणही मोठ्या प्रमाणावर या परिसरात राबवले आहे.कोरोना काळातही मोठं काम असून  महिला बचत गटांच्या समस्या सोडवण्याचे काम यापूर्वी केलेले असून  मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. आतापर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी हे गावात कोणालाच माहीत नव्हते. शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दुकानात त्यांचा शिक्का व सही उपलब्ध होती त्याचा हे उल्लेखनीय काम विद्यार्थ्यांसाठी असून विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप साठी देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेले आहे. या सामाजिक कामाबद्दल गळनिंब येथील व प्रभाग क्रमांक तीन मधील कार्यकर्त्यांनी एकमताने निवडणुकीत उभं करून बिगर खर्च निवडून आणले ते गळनिंब ग्रामपंचायतचे दहा वर्षे सदस्य असून श्रीरामपूर न्यायालयाच्या विधी सेवा समिती चे तीन वर्षे काम केले. याव्यतिरिक्त त्यांचं सामाजिक काम फार मोठे असून स्पंदन फाउंडेशनच्या माध्यमातून देखील अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले असून या पाच गावे वाड्या वरती ४२ मावस भाऊ,सासरवाडी घरातील सर्वांची, भावाची  सासरवाडी याच पाच गावात  असल्याने मोठे नातेगोते  व मित्रपरिवार  मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यात या भागातून जाणारा कोल्हार बेलपिंपळगाव रस्ता याचे काम देखील त्यांच्या रेट्यामुळे झाले. फत्याबाद मधील असणारे कोल्हार बेलापूर रस्त्यावरील गटार त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी काँग्रेटीकरण करून रस्ता उंचावण्यासाठीचा प्रस्ताव करण्यात आला. या ठिकाणी बोलले जाते. उक्कलगाव  प्रवरापट्ट्यातील पाच गावांच्या विकास कामासाठी त्यांचं मोठे प्रयत्न राहिले असल्याने परिसरातील नागरिकांची मनोमन इच्छा आहे त्यांनी उकलगाव गनातून पंचायत समिती निवडणूक लढवावी.


श्रीरामपूर (10 ऑक्टोबर 2025) : श्रीरामपूर तालुका शालेय क्रीडा खो-खो  मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धांचा आज चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूरच्या क्रीडांगणावर जल्लोषात शुभारंभ झाला. या उद्घाटनप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय कांबळे (चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर) होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख, पर्यवेक्षक विजय दळवी, परीक्षा विभाग प्रमुख प्रमोदकुमार राऊत, क्रीडा शिक्षक श्री. सुनील बनसोडे, प्रा. बाळासाहेब शेळके, तसेच श्रीरामपूर क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री. काकासाहेब चौधरी व सचिव श्री. संभाजी ढेरे उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांचा सत्कार काकासाहेब चौधरी यांनी केला, उपप्राचार्य डॉ. सादिक सय्यद यांचा सत्कार पुंडलिक शिरोळे सरांनी, तर प्रा. सुभाष देशमुख यांचा सत्कार विजय गाडेकर सरांनी केला. तसेच काकासाहेब चौधरी यांचा सत्कार प्राचार्य कांबळे यांनी केला. उपस्थित सर्व मान्यवरांचा व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांचा सत्कार प्रा. बाळासाहेब शेळके यांनी केला.

प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी खेळाडूंशी संवाद साधताना सांगितले की, “आयुष्यात प्रत्येकाने एक खेळ तरी खेळला पाहिजे. खेळामुळे शरीर सुदृढ राहते, आत्मविश्वास वाढतो आणि उज्ज्वल भविष्याची दिशा मिळते.”

यानंतर मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन विजय गाडेकर सरांनी केले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget