नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर ग्रामपंचायतीचा वृक्षवाटप उपक्रम स्तुत्यःसौ.धनश्री विखे पाटील
बेलापूरःराज्याचे जलसंपदामंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर ग्रामपंचायतीचा वृक्ष वाटपाचा उपक्रम स्तुत्य आहे.प्रत्येकाने आपला वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा करावा असे आवाहन सौ.धनश्री सुजय विखे पा.यांनी केले. अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नाम.श्री.विखे पा.यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण वा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे आवाहन केले होते.त्यास प्रतिसाद देत बेलापूर ग्रामपंचायत,सत्यमेव जयते ग्रुप तसेच बेलापूर-ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सौ.धनश्री विखे पा.बोलत होत्या.सदर कार्यक्रमात वड,पिंपळ,आंबा,टिकोमा,सप्तपर्णी,लिंब,स्पॕथोडीया,बकुळ अशा २००० हजार वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात श्री.अभिषेक खंडागळे म्हणाले की,बेलापूर-ऐनतपूर गावांच्या विकासात नाम.श्री.विखे पा.यांचे सततचे व मोलाचे योगदान आहे. १२६ कोटीची पाणीपुरवठा योजना,साठवण तलाव,घरकुले,विविध समाज घटकांची स्मशानभुमी,क्रिडांगण,सेंद्रिय खत प्रकल्प इत्यादी कामांसाठी नाम.श्री.विखे यांनी ४३ एकर जमिन ग्रामपंचायतीस मोफत दिली आहे.याशिवाय नुकतेच १००१ घरकुलांनाही मंजुरी मिळवून दिली आहे. यात डाॕ.सुजय विखे पा.यांचेही सतत सहकार्य लाभले. कार्यक्रमास भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे,बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने,भाऊसाहेब बांद्रे,डाॕ.शंकर मुठे,रामराव शेटे,सरपंच मिना साळवी,उपसरपंच प्रियंका कु-हे,सदस्य चंद्रकांत नवले,मुश्ताक शेख,जालिंदर कुऱ्हे, रणजित श्रीगोड, अँड.अरविंद साळवी,देविदास देसाई,प्रफुल्ल डावरे,भास्करराव खंडागळे,विष्णुपंत डावरे,भाऊसाहेब कुताळ, साहेबराव मोकाशी, अरविंद साळवी,शफिक बागवान, सुभाष अमोलिक,बाळासाहेब दाणी, गोरक्षनाथ कुऱ्हे,जनार्दन ओहोळ भाऊसाहेब कुडाळ ,प्रभात कुऱ्हे,विशाल आंबेकर,रमेश काळे,सचिन वाघ, भाऊसाहेब तेलोरे,मोहसीन सय्यद, मोकाशी दादा बंटी शेलार, श्रीहरी बारहाते महेश कुऱ्हे, सुधीर तेलोरे, गोपी दाणी,आदित्य शेटे, दीपक क्षत्रिय, शफीक आतार, आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment