नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वयासाठी छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरःडाॕ.पंकज आशिया
बेलापूरःनागरिकांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी तातडीने मिळणे आवश्यक आहे.यादृष्टिने शासकीय योजनांचा लाभ निर्धारित वेळेत मिळावा तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण व्हावा या हेतूने छञपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.आशाप्रकारच्या शिबिरांचे प्रत्येक महसूल मंडलात आयोजन करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डाॕ.पंकज आशिया यांनी केले. महसूल व वन विभाग तसेच बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथे आयोजित छ.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थितांना संबोधताना जिल्हाधिकारी बोलत होते.याप्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,नायब तहसीलदार बी.बी.गोसावी,श्री.शेकटकर, श्रीमती निर्मला नाईक,जि.परिषद सदस्य शरद नवले,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे,सरपंच मिना साळवी,उपसरपंच प्रियंका कु-हे,रामराव शेटे,मंडलाधिकारी सर्वश्री विठ्ठल गवारी,सुशीम ओहोळ,तलाठी सर्वश्री राजेश घोरपडे,अक्षय जोशी,श्रीमती सुवर्णा शिंदे,शिल्पा राणे,वर्षा कातोरे, हिमालय डमाळे,अशोक थोरात,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे कोतवाल सुनिल बारहाते नंदू बोंबले अरुण अमोलीक ज्ञानेश्वर भांड संतोष पारखे दिपक बेल्हेकर उपस्थित होते. सदर शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी डाॕ.आशिया यांचे हस्ते नागरिकांना सेतू कार्यालयाकडील जातीचे दाखले,संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपञ,पुरवठा विभागाकडील आॕन लाईन पध्दतीचे रेशन कार्ड,ग्रामपंचायत वतीने मृत्यु दाखला, कृषी विभागाकडून खत गोणी,गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान मंजुरी पञ,ग्राममहसूल अधिकारी कार्यालयाकडील हयातीचा दाखाला आदिं प्रदान करण्यात आले.देविदास देसाई,विष्णुपंत डावरे यांनी सूञसंचलन केले. दिवसभर चाललेल्या महाराजस्व शिबिरात उपस्थितांना विविध शासकीय योजनांचे दाखले, ऑनलाइन रेशन कार्ड,शासकिय प्रमाणपञे,ग्रामपंचायत दाखले अपघात विमा मंजुरी पत्र वितरीत करण्यात आले.शिबिरास बेलापूर महसूल मंडलातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.शिबिरस्थानी विविध महिला बचत गटांनी खाद्यपदार्थ,मसाले आदि उत्पादनांचे स्टाॕल लावले होते.शिबिरास भास्कर खंडागळे, मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,हाजी इस्माईल शेख,मारुतराव राशिनकर, अॕड.अरविंद साळवी,भैय्या शेख,जाकीर शेख,बाबालाल पठाण,महेश कु-हे,प्रभात कु-हे,बाबुराव पवार,चंद्रकांत नाईक, मिलिंद दुधाळ,प्रकाश कु-हे,गणेश बंगाळ,रावसाहेब गाढे,विशाल आंबेकर ,भाऊसाहेब तेलोरे,इस्माइल आतार आदिंसह बचत गटाच्या महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment