महिलांनी संघर्ष करुन स्वावलंबी बनावे -स्वाती अमोलिक
बेलापूरः(प्रतिनिधी )-गावकरी मंडळाने महिलांना गावाचा कारभार करण्याची संधी दिली.पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे व माजी खा.डाॕ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंंचायत विकासाभिमुख कारभार करीत आहे.महिलांना कतृत्वाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वावलंबी व आत्मनीर्भर बनून विविध क्षेञात यश मिळवावे असे आवाहन सरपंच स्वाती अमोलिक यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित विशेष महिला ग्रामसभेच्या अध्यक्षपदावरुन त्या बोलत होत्या.याप्रसंगी उपसरपंच प्रियंका कु-हे,माजी उपसरपंच तबसुम बागवान,सदस्या श्रीमती शिला पोळ,प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॕ. अश्विनी लिप्टे,वैद्यकीय अधिकारी डाॕ.सोनल दराडे यांचेसह महिला उपस्थित होत्या. . प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य आधिकारी डाॕ.आश्विनी लिप्टे यांनी महिला आरोग्यविषयक सविस्तर माहिती दिली.जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत तसेच पञकार संघाच्या वतीने सरपंच स्वाती अमोलिक,उपसरपंच प्रियंका कु-हे,सदस्य तबसुम बागवान,शिला पोळ,वैद्यकीय अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे व डाॕ.सोनल दराडे, जि.प.मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका उदमले मॕडम, बचत गट संघाच्या अध्यक्ष आशा गायकवाड स्वच्छता कर्मचारी सगुणा तांबे त्याचबरोबर सर्पमित्र सौ राजश्री निलेश अमोलिक हिचा इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प.सदस्य शरद नवले,पञकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे ,देविदास देसाई यांनी मनोगत व्यक्त करुन विविध सुचना केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिषेक खंडागळे यांनी केले तर ग्रामविकास आधिकारी निलेश लहारे यांनी सद्यस्थितीतील कामकाजाची माहिती दिली.यावेळी तंटामुक्तीचे आध्यक्ष बाळासाहेब दाणी, इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संपादक संघाचे संस्थापक अध्यक्ष पञकार असलम बिनसाद संजय वाहुळ राजुभाई शेख वंदना गायकवाड दिलिप दायमा,पोलिस पाटिल अशोक प्रधान,दादासाहेब कुतळ, बाबुराव पवार आदि उपस्थित होते.
Post a Comment