बेलापूर बु!! ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गावकरी मंडळाच्या स्वाती अमोलिक यांची निवड.

बेलापूरःराजकीयदृष्ट्या बहुचर्चित बेलापूर बु!!ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महसूल मंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या नेतृत्वाखालील व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या स्वाती उत्तमराव अमोलिक यांची निवड झाली.निवड चुरशीची होईल अशी चर्चा असताना ११-६ अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवून सुधीर नवले, रविंद्र खटोड,अरुण पाटील नाईक, भरत साळुंके यांच्या नेतृत्वा खालील जनता विकास आघाडीला गावकरी मंडळाने धक्का दिला.                                           बेलापूर बु!!ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी मंडल अधिकारी  श्री.भिमराज मंडलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली.बैठकीस  उपसरपंच अभिषेक खंडागळे,सदस्य मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे,मीना साळवी,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,महेन्द्र साळवी,रविन्द्र खटोड,भरत साळुंके,शिला पोळ,रंजना बोरुडे,छाया निंबाळकर उपस्थित होते.सरपंच पदासाठी गावकरी मंडाळाकडून स्वाती अमोलिक तर जनता आघाडीकडून रमेश अमोलिक यांनी उमेदवारी केली.गावकरी मंडळाकडे दहा तर विरोधकांकडे सहा असे संख्याबळ होते तर माजी सरपंच महेंद्र साळवी यांची भूमिका गुलदस्त्यात होती. असे असताना स्वाती अमोलिक यांना अकरा तर रमेश अमोलिक यांना सहा मते मिळाली.विरोधकांचे एक मत फुटल्याची चर्चा निवडीनंतर रंगली होती. निवडीनंतर ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सत्कार समारंभ व आभाराची सभा संपन्न झाली.यावेळी बोलताना जि.प.सदस्य शरद नवले यांनी विरोधकांचा समाचार घेतला ते म्हणाले की विरोधकांना चांगले काम देखवत नाही.सातत्याने विकासकामात अडथळे आणण्याचे एकमेव काम विरोधक करतात.नाम.राधाकृष्ण विखे पा. यांनी गावासाठी १२६ कोटीची पाणी पुलावठा योजना तसेच ४ कोटी किमतीची आठ एकर जागा साठवण तलावाला मोफत दिली.पण विरोधकांत चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत नाही.  विरोधकांच्या घाणेरड्या राजकारणाचा परिणाम गेली वर्षभर गावाच्या विकास कामांवर झाला.पण आता विरोधकांना गावकरी मंडळाने चोख उत्तर दिले असून यापुढील काळात ठप्प झालेल्या विकासकामांना गती दिली जाईल.सरपंच व उपसरपंच व सदस्यांनी चोख कारभार व विकास कामे करावीत बाकी आडव्या जाणाऱ्या मांजरांचा बंदोबस्त करण्याचे कामा मी करीन असे श्री.नवले म्हणाले.                          उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की,आजचा विजय हा गावकरी मंडळाच्या एकजुटीचा व ग्रामास्थांचा आहे. विरोधकांचे चाणक्य सरपंच निवडीबाबत शेखी मिरवित होते तसेच मोठा घोडेबाजार करू पाहत होते परंतु  आजचा विजय मिळवून राजकीय शकुनी मामांना सडेतोड उत्तर दिले आहे.विरोधकांच्या वल्गनांचा व अहंकाराचा आज फुगा फुटला आहे. महसूलमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.यांच्या सहकार्याने विकास कामांचा रथ आम्ही हाकीत आहोत.हा रथ अडविण्याचा विरोधकांनी आटोकाट प्रयत्न केला पण आजच्या दणदणीत विजयाने विरोधकांचे पितळ उघडे पडले आहे.आजवर आम्ही सबुरीने घेतले पण यापुढे माञ नाठाळपणा केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल.यापुढील काळात नाम.विखे पा.यांच्या सहकार्याने  तसेच समन्वयाने गावाचा विकास केला जाईल त्यास सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन श्री.खंडागळे यांनी केले.यावेळी जालिंदर कुऱ्हे, हाजी इस्माईल शेख,विष्णुपंत डावरे,सुधाकर खंडागळे,बाळासाहेब दाणी, पुरुषोत्तम भराटे,एकनाथ नागले,भाऊसाहेब कुताळ,मोहसीन सय्यद,अँड.अरविंद साळवी,रावसाहेब अमोलिक,गोपी दाणी आदींची भाषणे झाली.यावेळी कार्यकर्ते,हितचिंतक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडणुक आधिकारी श्री.मंडलिक यांना कामगार तलाठी श्री. प्रविण सूर्यवंशी,श्री.अक्षय जोशी, ग्रामविकास अधिकारी श्री. मेघशाम गायकवाड यांनी सहकार्य केले.पोलिस यंञणेने चोख पोलिस बांदोबस्त राखून निवडणूक शांततेत पार पाडली.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget