अहमदनगर प्रतिनिधी- अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक इसम हा गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथे येणार आहे. आता लागलीच गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउनि/सोपान गोरे, सफौ/राजेंद्र देवमन वाघ, संजय खंडागळे,पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, पोना/भिमराज खसे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के अशांनी मिळून दोन पंचासह खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी येथे जावून सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच एक इसम विठामाधव थिएटर, राहुरी फॅक्टरी येथे मोटार सायकलवर येतांना दिसले, त्यांना हाताने इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगितले त्यावेळी त्यांनी मोटार सायकल रोडच्या कडेला थांबविली पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना घेराव घालून ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) किशोर बाळासाहेब खामकर वय ३२, रा. राजुरी, ता. राहाता २) किशोर साईनाथ शिणगारे वय २८, रा. गोमाळवाडी, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये दोन गावठी बनावटी कट्टे, सहा जिवंत काडतूसे, व प्लेझर मोपेड असे एकूण १,२१,२००/रु.किं.चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर बाबत सफौ/राजेंद्र देवमन वाघ, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच दरम्यान श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबन्याकडून माहिती मिळाली कि, दोन इसम गावठी कट्टा व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी औरंगाबाद नगररोडने अहमदनगरकडे येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी वर नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांना खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. नमुद आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार बातमीतील नमूद ठिकाणापासून गाडी रस्त्याचे कडेला आडोशाला लावून शेंडी बायपास चौकामध्ये, ता. जि. अहमदनगर येथे सापळा रचुन थांबले असता, दोन इसम संशयीतरित्या हे त्यांचेकडील बजाज प्लॅटींना काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर औरंगाबाद कडुन येतांना दिसले असता, त्यांना हाताने इशारा करुन मोटार सायकल थांबविण्यास सांगीतले असता, मोटार सायकल चालकाने मोटार सायकलचा वेग कमी केला. त्यावेळी त्याच्या मागे बसलेल्या इसमास पकडले असता मोटार सायकल चालकास संशय आल्याने तो तसाच मोटार सायकल घेवुन औरंगाबादच्या दिशेने पळून गेला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आलेला नाही. पकडलेल्या इसमास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) अभय अशोक काळे वय २४, रा. शिरसगांव, ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याची अगंझडती घेतली असता त्यांच्या कब्जात देशी बनावटीचे दोन पिस्टल (गावठी कट्टा) व सहा जिवंत काडतुसे असा एकुण ५१,२००/- रु.किं.चा मुद्देमाल मिळुन आला त्यास त्याचा जोडीदार मोटर सायकलस्वार याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विवेक लक्ष्म शिंदे (फरार) रा.घोगरगांव रोड, टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर असे सांगितले. वर नमुद दोन्ही गुन्ह्यातील आरोपीकडे सदर देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्ट) कोठुन आणले याबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सदरचे गावठीकट्टे व जिवंत काडतुस हे सागर रोहिदास मोहिते (फरार) रा. शिरसगांव, ता.नेवासा याचेकडुन घेतले बाबत सांगितले.वरील प्रमाणे राहुरी व एमआयडीस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन चार पिस्टल (गावठी कट्टे), १२जिवंत काडतसे व एक प्लेझर मोपेड गाडी असा एकुण १,७२,२००/-रु.कि.चा मुद्देमाल व तीन आरोपी ताब्यात घेवून राहुरी व एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई राहुरी व एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपी नामे विवेक लक्ष्मण शिंदे (फरार) हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस चोरी व विनयभंग करणे असे एकुण ०२ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. १) श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. २०१/२०२१ भादविक ३५४, ३२३, ५०४, ५०६ २) गंगापुर पोलीस स्टेशन, जिल्हा औरंगाबाद २८४/२०२० भादविक ४६१, ३८०, ३४ आरोपी नामे सागर रोहिदास मोहिते (फरार) हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खालील प्रमाणे विविध पोलीस ठाणेस मारहाण करणे, आमली पदार्थ, दारुबंदी व घातकशस्त्रे बाळगणे व विक्री असे एकुण ०६ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.१) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६६/२०१५ भादविक १४३, ३२३ २) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. २०४/२०१५ मुं.दा.का.क. ६५ (ई) ३) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३२/२०१७ मुं.दा.का.क. ६५ (ई) ४) नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२२/२०१७ भादविक ३२३, १४३ सह आर्म अॅक्ट ३/२५ ५) सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. २०/२०१४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ ६) अंबड पोलीस स्टेशन जिल्हानाशिक गु.र.नं. ३१०३/२०१६ एनडीपीएस २०, २२ सदर कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर, श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर, श्री.संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे.
Post a Comment