बेलापुर (प्रतिनिधी )-तालुक्यात सर्वात मोठी असलेल्या बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरुझाली असुन आजपासुन उमेद़्वारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे एकुण तेरा जागेसाठी ही निवडणूक होत असुन एकुण १०२५ सभासदापैकी केवळ ६९० सभासदांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे आठ संचालक सर्वसाधारण दोन महीला एक ओबीसी एक एससी व एक भटक्या विमूक्त असे एकुण तेरा सांचालक निवडले जाणार आहे तेरा जागेकरीचा फाँर्म भरण्याची मुदत दिनांक २ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत फाँर्म भरणे दिनांक ९ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता छाणणी दिनांक १० फेब्रुवारी उमैद़्वार यादी प्रसिध्द करणे दिनांक १० फेब्रुवारी २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२२ माघार घेणे दिनांक २५ फेब्रुवारी चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिध्द करणे दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ८ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे ,मागील वेळेस बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जनता अघाडीचे रविंद्र खटोड यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या होत्या तरा जि प सदस्य शरद नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक अभिषेक खंडागळे यांच्या गटाला ४ जागा मिळाल्या होत्या त्या नंतर तीन संचालाक अपात्र झाले होते या संस्थेची आर्थिक उलाढाल मोठी असुन संस्थेच्या मालकीचा पेट्रोल पंपआहे स्वःमालकीची भव्य अशी ईमारत आहे संस्थेकडे दोन स्वस्त धान्य दुकान आहेत संस्थेकडे खत डेपो आहे अशी उत्पन्नाची साधने आहेत.
Post a Comment