अहमदनगर प्रतिनिधी-नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या तालुक्यातील मक्तापूर येथील एका सराईत गुन्हेगारास नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याच्या पोलीस पथकाने कट्ट्यासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत नगरच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, एक इसम गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सोनई येथे येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिंळाल्याने त्यांनी आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हवालदार मनोहर गोसावी, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, देवेंद्र शेलार, कॉन्स्टेबल सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, रोहित येमूल व चालक हवालदार बबन बेरड अशांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव येथे सापळा लावला.तिघे सचिन वसंतराव कोळेकर रा. मक्तापूर ता. नेवासा याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा 26 हजार रुपये किमतीच्या वस्तू मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले.सचिन वसंतराव कोळेकर याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. सेकंड 35/2022 आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.
Post a Comment