याप्रसंगी श्रीरामपूर नगर पालिकेच्या मा.उपनगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,माजी उप नगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख,अॅड.जयंत चौधरी,शहर काझी मौलाना अकबरअली सहाब,मा.नगरसेवक हाजी मुख्तारभाई शेख,राजेश अलघ, रविंद्र गुलाटी, कलिम कुरेशी, साजिद मिर्झा,रर्ईस जहागीरदार, अल्तमश पटेल, लड्डू शेख सर, शौकत शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
"जो निर्पेक्षतेने समाजाची सेवा करतो,उपेक्षित आणि रांजल्या- गांजल्या गोर-गरीबांच्या सुख: दुःखात नेहमी अग्रक्रमाने धाऊन येतो तोची खरा समाजाचा खरा समाजसेवक असतो" सदरील वाक्य हे सोहेलभाईंचे निर्पेक्ष कार्य आणि समाजसेवेप्रसंगी तंतोतंत खरे ठरते,
श्री.सोहेलभाई यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव न करता केक सेलिब्रेशन पटाखे,ढोल,ताशे,डिजे या सर्व बाबींना फाटा देत,आपणही समाजाचे काही देणे लागतो केवळ हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन परिसरातील उपेक्षित आणि गरजु समाज घटकांना अन्नधान्य किटचे वाटप करत एका अनोख्या पद्धतीने उम्मती फाऊंडेशनतर्फे हा वाढदिवस साजरा करण्यात आला,
तसे वर्षाच्या बाराही महिने उम्मती फाऊंडेशनतर्फे विविध सामाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवली जातातच,मागे कोरोना महामारी काळात उम्मतीतर्फे परिसरातील उपेक्षितांना घटकांना अन्नधान्य किट,किराणा किट, औषधोपचार,सोबतच सातत्याने विविध आरोग्य शिबीरे आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सामाजाची सेवा ही उम्मतीतर्फे अखंडित आणि अविरतपणे चालुच असते,खरेतर इतरही सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनी उम्मती फाऊंडेशनच्या कार्यांचे अनुकरण करत त्यांचा आदर्श घ्यावा असे उपस्थित सर्वच पाहुणे मंडळींनी यावेळी बोलुन दाखविले तथा सोहेलभाईंनी आता राजकारणात यायला हवे यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यांना अधिक बळकटी प्राप्त होऊन आधिकाधिक उपेक्षित घटकांच्या अनेको समस्यांचे निराकरण होणेकामी मोठी शक्ती प्राप्त होऊ शकेल असेही याप्रसंगी हाजी अंजुमभाई शेख म्हणाले.
याप्रसंगी अॅड.आरिफ शेख, अॅड.मोहसिन शेख,तौफिक शेख,रि.पोलिस जमादार इब्राहिमभाई शेख,मुद्दस्सिर शेख,जाकीर शहा,अकबर शेख,शहानवाज दिलावर सर, महेबुब शहा,आदी मान्यवर उपस्थित होते,
Post a Comment