टिपू सुलतान यांच्याविषयी अपशब्द बोलणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर कारवाई करा.

श्रीरामपूर प्रतिनिधी - बहूजन समाजाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हजरत टिपू सुलतान यांचा अवमान करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यासाठी व सामाजिक, धार्मिक सलोखा बिघडवलेवरुन गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई करणेसाठी बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा आदी समविचारी पक्ष व संघटनांनी गांधी पुतळ्यासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांमार्फत फडणवीस यांच्यावर कारवाईची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांंच्याकडे केली.निवेदनात म्हंटले आहे कि, आपल्या महाराष्ट्र राज्याला सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचा व गौरवशाली इतिहासाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. विद्यमान राज्य विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतान यांचेबाबत अवमानकारक वक्तव्य करून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. अशोभणीय कृत्य करुन देवेंद्र फडणविस हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे तसेच धार्मिक दृष्ट्या वातावरण कलुषित करून हिंदू-मुस्लिम असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हजरत टिपू सुलतान यांच्याविषयी त्यांनी केलेले वक्तव्य हे बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत.वास्तविक पाहता हजरत टिपू सुलतान हे मुलनिवासी बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी लढणारे योद्धे होते. हजरत टिपू सुलतान हे हिंदु विरोधी किंवा बहुजन विरोधी नव्हते. त्यांनी १५६ हिंदु मंदिरांना मदत केलेली आहे. शृंगेरी मंमठावर सांगलीच्या पटवर्धनाने व्यक्तीने हल्ला केला होता तेव्हा तो मठ वाचवण्यासाठी हजरत टिपू सुलतान यांनी मदत केली होती. हिंदू महिलांना कमरेच्या वरती वस्त्र घालण्याचा अधिकार तत्कालीन कर्मठांनी नाकारला होता. तो अधिकार मिळवून देणारा एकमेव राजा हजरत टिपू सुलतान होय. हजरत टिपू सुलतान यांच्या सैन्यात ६० टक्के हिंदू सैन्य होते. यावरून असे सिद्ध होते की टिपू सुलतान हे हिंदू विरोधी किंवा हिंदूंचे दुश्मन नव्हते हा इतिहास आहे. जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन उचित कारवाई करण्यात आली नाही तर येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपात राज्यव्यापी व राष्ट्रव्यापी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व यातून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हंटले आहे.यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजक आर एम धनवडे, बहुजन मुक्ती पार्टी सुरेश चौदन्ते, जिल्हाध्यक्ष दिलीप बदधे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ. हमीद शेख, एम. एम. पठाण, रियाज अन्सारी, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाचे कर्डक, एमआयएमचे आदिल मखदुम, सजिद मिर्झा, डॉ. अशोक शेळके, संतोष गायकवाड, प्रमोद शेळके, राजू लोंढे, सुरेशचंद्र भोसले, पंडित पगारे, सुनील गाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget