जि. बीड हे मालवाहु ट्रक घेवुन जात असतांना नगर सोलापुर हायवे, पाटेगाव, शिवार ता कर्जत येथे पल्सर
मोटार सायकलवर आलेले तीन इसमांनी ट्रक समोर मोटार सायकल आडवी लावुन शस्त्राचा धाक दाखवुन
४५०००/- रु किमतीचा मुददेमाल त्यात एक मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली. त्याबाबत फिर्यादी
यांनी कर्जत पो.स्टे येथे दिलेल्या फिर्याद वरुन कर्जत पो.स्टे. गु.र.नं. ४६२/२०२० भादवी कलम ३९४,३९७
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा पोनि/दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने समांतर तपास करत असतांना पो.नि. दिलीप पवार यांना गोपनिय माहिती मिळाली कि, सदर गुन्हा हा शाहुराज बाबासाहेब कोकरे, रा. घाटापिंपरी, ता आष्टी जि. बीड याने त्याचे साथीदारासह केला असुन तो दिघी गावचे शिवारात ता कर्जत येथे लपुन बसला असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने पथकातील पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ दत्ता गव्हाणे, बाळासाहेब मुळीक,पोना रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, दिपक शिंदे, पोकॉरणजीत जाधव, प्रकाश वाघ, रोहीत मिसाळ, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर अश्यांनी मिळुन दिघी ता कर्जत येथे जावुन मिळालेल्या बातमीनुसार आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे १) शाहुराज बाबासाहेब कोकरे, बब २०, रा. घाटापिंपरी, ता आष्टी जि. बीड यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर गुन्हया बाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा हा साथीदार नामे २)गणेश बाळासाहेब महारनोवर, रा. दिघी, ता कर्जत, जि. अ.नगर ३) योगेश देबराव गोयेकर, रा. गोयेकरबाडा, ता कर्जत, जि. अ.नगर, (फरार) ४) नाथा शिरगिरे,रा. जामखेड,(फरार) अश्यांनी मिळुन दि. ०१/०७/२०२० रोजी रात्री एका साथीदारास त्याचेकडी २२० पल्सर मोटार सायकलवर पाळत ठेवण्यासाठी नगर ते सोलापुर रोडवर पाटेगाव शिवार ता कर्जत येथे थांबवुन आम्ही तीघे आमचेकडील पल्सर मोटार सायकल २२० हिचे वर पाटेगाव स्पीड ब्रेकर जवळ जावुन एका ट्रक चालकास आडवुन त्याचेकडुन मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेल्याचे सांगुन गुन्हयातील गेला मुददेमाल एक १५,०००/- रु किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल व गुन्हयात वापरलेली काळे लाल रंगाची ५०,०००/- रु किमतीची पल्सर जागीच जप्त करुन गुन्हयातील इतर आरोपींचा शोध घेता आरोपी नामे गणेश बाळासाहेब महारनोवर, २० रा. दिघी, ता कर्जत, जि. अ.नगर यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल बाबत विचारपुस करता ती मी व माझा साथीदार नामे २) योगेश देवराव गोयेकर, रा. गोयेकरवाडा, ता.कर्जत, जि. अ.नगर, असे आम्ही मिदनकरवाडी, चाकन, ता खेड जि. पुणे येथुन चोरी केली असल्याचे सांगितले.क्र. १ व २ यांना अधिक विचारपुस करता त्यांनी वरील साथीदारांचे सहाय्याने दि. १०/०६/२०२० रोजी पाटेगाव चे शिवारात वळणावर ता कर्जत येथुन सॅनिटायझर घेवुन जाणारा ट्रक अडवुन चालकास मारहाण करुन ट्रक लुटुन नेला परंतु जातेगाव शिवारात पोलीस चेक पोस्ट असल्याने व पोलीस वाहनांची चेकींग करत असल्याने आम्ही सदर ट्रक सोडुन पळुन गेलो असे सांगितल्याने सदर बाबत कर्जत पो.स्टे. येथे खात्री करता सदर बाबत कर्जत पो.स्टे. गु.र.नं. १ ४१६/२०२० भादवी कलम ३९४,३४ प्रमाणे दाखल आहे. गुन्हयातील इतर आरोपींचा शोध घेता मिळुन आले नाही आरोपी क्र. १ व २ यांना मुददेमालासह कर्जत पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास कर्जत पो.स्टे.करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.
श्री. सागर पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री.संजय सातव सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
Post a Comment