श्रीरामपूर शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल पुन्हा श्रीरामपूर शहरात सहा रुग्ण आढळून आले आहेत. वॉर्ड नं. 2, सुभेदार वस्ती भागात 4 तर ‘त्या’ अधिकार्याच्या कुटुंबातील आणखी दोघांना करोनाची लागण झाली आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 30 वर जावून पोहोचली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.काल वॉर्ड नं. 2 सुभेदार वस्ती या भागात 30 व 25 वर्षाच्या दोन महिला, 20 वर्षाच्या तरुणासह एक 6 वर्षाचा लहान मुलगा या चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच वॉर्ड नं. 7 मधील करोना बाधीत ‘त्या’ अधिकार्याचा भाऊ व त्याची भावजाई अशा दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे या अधिकार्याच्या घरातील करोन रुग्णांची संख्या सात झाली आहे. कालपर्यंत 67 अहवालाची प्रतिक्षा होती. या अहवालापैकी काल 23 अहवाल निगेटीव्ह आले असून अद्याप 35 अहवालांची प्रतिक्षा आहे.वॉर्ड नं. 2 मध्ये करोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यामुळे तसेच करोनामुळे एकाचा मृत्यू झाल्यामुळे हा भाग कंटेन्टमेंट झोन जाहीर केला. यामुळे या भागातील सर्व भाग सील करण्यात आला होता. मात्र काल पुन्हा चार अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे वॉर्ड नं. 2 मधील सर्व लहान मोठे रस्ते सील करण्यात आले आहेत.संपूर्ण वॉर्ड नं.2 मधून कोणीही बाहेर येणार नाही अशा पध्दतीने सीलबंद करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी, तहसीलदार, तसेच पोलिसांनी वॉर्ड नं. 2 मधून पहाणी करत सर्व भागातून येणार्या रस्त्यांची पहाणी केली व नागरिकांना स्वतःची काळजी घेवून खबरदारी घेण्याचे आवाहन करत कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करत होते.
Post a Comment