पोना/2022 माने, पोकॉ/316 थोरात असे सोनई पोलीस ठाणे येथे हजर असतांना सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, MIDC परीसर, झापवाडी शिवार, ता. नेवासा येथे एक इसम एका पांढ-या रंगाच्या कारमध्ये सुगंधी लाकडे (चंदन) भरीत आहे. अशी गोपनिय माहिती मिळाली.सदर माहीती ठाणेदार श्री.जनार्दन सोनवणे यांना देवुन मिळालेल्या गोपनिय माहिती प्रमाणे सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांचे सापळा पथक सकाळी 07.00 वा MIDC परीसरात पोहोचले तेव्हा एक इसम सुगंधी चंदनाचे लाकडे एका पांढ-या रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट डीझायर कारमध्ये भरत असतांना मिळुन आला. पोलीस स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आण्णा लक्ष्मण गायकवाड वय 36 वर्षे रा. घोडेगाव ता. नेवासा असे सांगीतले. नमुद इसम हा मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट डीझायर गाडी क्रमांक MH 16 BH 3789 मधुन सुगंधी चंदनाचे लाकडे भरत होता. आण्णा लक्ष्मण गायकवाड यास ताब्यात घेवुन लाकडी सुगंधी चंदन बाळगणे,वाहतुक करणे,विक्री करणे बाबत, सदर चंदन कोठुन आणले,कोठे घेवुन जाणार आहे या बाबत इसम नामे आण्णा लक्ष्मण गायकवाड यास विचारपुस केली असता त्याने कोणत्याही प्रकारचे समर्पक उत्तर दिले नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा परवाना असले बाबत उत्तर दिले नाही. तेव्हा पोलीसांची व पंचांची खात्री झाली की, सदरचे सुगंधी लाकडी चंदन इसम नामे आण्णा लक्ष्मण गायकवाड याने बेकायदेशीरपणे बाळगले असुन चोरट्या पध्दतीने त्याची वाहतुक करुन अवैध प्रकारे विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले असुन कोणत्यातरी अज्ञात ठिकाणी सदर सुगंधी चंदनाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने वरील वर्णनाच्या कारमध्ये भरताना मिळुन आला आहे. आण्णा लक्ष्मण गायकवाड याचेकडे पुढीलप्रमाणे माल मिळुन आला आहे..1) 2,53,000/- रु चे साळलेले सुगंधी लाकडे चंदनचे लहाण - मोठे एकुण 115 कि.ग्रॅ. वजनाचे एकुण सहा प्लॅस्टीकच्या गोणीत भरलेले. किंमत अंदाजे 2) 5,00,000/- रु किंची एक मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट डीझायर कार क्रमांक MH 16 BH 3789 तीचा चेसीस क्रमांक MA3EJKDIS00747116 इंजीन क्रमांक K12MN1601591 असलेली असा एकुण 7,53,000/- रु किंमतीचा मुद्देमाल सदरची प्रशंसनीय कारवाई मा.पोलीस अधिक्षक सो अहमदनगर श्री.अखिलेशकुमार सिंह,मा.अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर दिपाली काळे मॅडम,मा,अपर पोलीस अधिक्षक अहमदनगर श्री सागर पाटील साहेब,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो शेवगाव श्री मंदार जावळे ,मा.ठाणेदार श्री.जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्क पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात,पोहेकॉ दत्तात्रय गावडे,पोहेकॉ संजय चव्हाण पोना किरण गायकवाड,पोना शिवाजी माने,पोकॉ विठ्ठल थोरात,पोकॉ मोरे,पोकॉ वाघमोडे यांनी केली.
Post a Comment