शिर्डी जितेश लोकचंदानी कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेले तसेच कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचे निदर्शनाला आल्याने संशयित असे कोरोना रुग्णांना शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या फेज २ या धर्मशाळेत स्वतंत्र विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते, अश्या एकूण 60 रुग्णांपैकी काल 23 व आज 32 रुग्णांना ठीक झाल्यानंतर आपापल्या घरी सोडून देण्यात आले आहे,
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, तसेच या सापडलेल्या कोरोना च्या रुग्णांच्या संपर्कात आलेले अनेक जण आहेत ,अशांना नगर व विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, काही होम कॉंरटाईन करण्यात आले आहे,तर शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान च्या साई आश्रम फेज टू या धर्म शाळेतील हॉलमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करून येथे असे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले व संशयित एकूण 60 रुग्णांना गेल्या पंधरा दिवसा पूर्वी ठेवण्यात आले होते, चौदा दिवस येथे या रुग्णांना ठेवून त्यांच्यावर राहता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गोकुळ घोगरे, डॉक्टर स्वाती मस्के व त्यांच्या वैद्यकीय पथकाने, साईबाबा संस्थान च्या वैद्यकीय पथकाने विविध औषध उपचार केले तसेच साई संस्थान मार्फत त्यांना जेवण ,नाश्ता ,चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती ,या साठ रुग्णांपैकी 23 रुग्ण पूर्ण बरे होऊन त्यांना काल सोडण्यात आले ,तर त्यानंतर आज 32 रुग्णांना या विलगीकरण कक्षातून पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले, काल आणि आज मिळून एकूण पंचावन्न संशयित रुग्ण पूर्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले,
या लोकांनी या काळात प्रशासनाने आमची सर्व व्यवस्था उत्तम ठेवली, याबद्दल आभार मानले ,या सर्व रूग्णांवर व उपचार ,तेथील व्यवस्था यावर राहता तहसीलदार कुंदन हिरे हे विशेष लक्ष ठेवून होते,
शिर्डी नगरपंचायत ,श्री साईबाबा संस्थान, पंचायत समिती राहता चे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनीही प्रशासनाला यासाठी मोठे सहकार्य केले ,असे तहसीलदार कुंदन हिरे यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment