शिर्डी जितेश लोकचंदानी- सध्या कोरनामुळे लॉकडाऊन सुरू असून या काळात सर्वसामान्य गरीब व मोलमजुरी करणारेचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा गरजू व गोरगरीब व्यक्तींना निवारा व भोजन यांची व्यवस्था प्रशासन ठिक ठिकाणी करत असून शिर्डी व परिसरासाठी तसेच राहाता तालुक्यातील परराज्यातील मजुरांसाठी शिर्डी जवळील श्री साई पालखी निवारा मध्ये विशेष कक्ष उभारण्यात आला आहे , लॉक डाऊन चे नियम पाळत व सर्व दक्षता घेत येथे या कक्षामध्ये काही व्यक्तींना तसेच रुग्णांना शिर्डी जवळील निघोज येथील ठेवण्यात आले असून त्यांना येथे आरोग्य व सर्व सुविधा प्रशासन देत आहे ,
साई पालखी निवारा येथे 30 मार्च 20 20 पासून एकूण 142 लोक येथे ठेवण्यात आले असून यामध्ये 30 परराज्यातील आहे व 112 महाराष्ट्रातील आहे ,त्यामध्ये बारा महिला व दोन मुले असून या सर्वांची देखभाल व्यवस्थित करण्यात येत असल्याची माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली,
सध्या राज्यात कोरोनाने हाहाकार माजला असून जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, त्या अनुषंगाने जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे, सर्वत्र काम धंदा बंद आहे, या मुळे सर्व गोरगरीब, मजदूर यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होत , राहता तालुक्यातील अशा गरजू व परराज्यातील मजूर लोकांना अडचण भासू नये किंवा त्यांची राहण्याची ,जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिर्डी जवळील साई पालखी निवारा येथे विशेष कक्ष उभारण्यात आला आहे, या कक्षामध्ये गरजू गोरगरीब व संशयित काही रुग्ण असे एकूण 142 लोकांची येथे व्यवस्था करण्यात आली आहे ,30 मार्च पासून येथे हे लोक ठेवण्यात आले असून 112लोक राज्यातील आहे व 30 हे परराज्यातील आहे ,यामध्ये बारा महिला व दोन मुले आहेत ,या सर्व लोकांना सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे व त्यांचे सर्व वैद्यकीय पथक, आरोग्यसेविका दररोज तपासणी व औषध उपचार करत आहेत, त्याच प्रमाणे निमगाव ,निघोज शिर्डी चे कामगार तलाठी येथे देखरेख व व्यवस्था ठेवत आहेत, श्री साईबाबा संस्थान तर्फे या लोकांना सकाळ व संध्याकाळ दोन टाईम जेवण देण्यात येत आहे ,त्याचप्रमाणे इतर सामाजिक संस्थांकडून नाष्टा, दोन वेळेस चहा देण्यात येत आहे, तसेच या लोकांना टी-शर्ट, साबण, टूथपेस्ट ,व इतर आवश्यक सामान देण्यात आले आहे, या लोकांची सर्व व्यवस्था प्रशासन उत्तम रीतीने करत असून या सर्व लोकांना या लॉकडाऊन काळात येथेच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली, शिर्डीचे तलाठि अनिल मांढरे नोडल अधिकारी व महसूलचे कर्मचारी दिलीप मते यांच्या देखरेखीत उत्तम प्रकारे सेवा सुरू आहे. सध्या देशात राज्यात व जिल्ह्यात कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू आहे ,त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सर्व तो प्रयत्न करीत आहे, अशावेळी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, विनाकारण घराबाहेर नागरिकांनी पडू नये, आपल्या घरातच राहावे ,तोंडाला मास्क लावावे ,लॉक डाऊन चे नियम पाळावेत, असे आवाहन राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
Post a Comment