आठ महिन्यांचा 'शिवांश', कॉंग्रेसचे सत्यजीतदादा तांबे आणि हैदराबाद.

(जबरदस्त व्हायरल होत असलेलं एका लेटरची 'स्टोरी' खास आमच्या वाचकांसाठी)
प्रिय सत्यजीत दादा..,
नमस्कार.
आज तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यातल्या सुसंस्कार आणि माणुसकीने राहातेकरांना जिंकलं.. आठ महिन्याच्या आजारी 'शिवांश'साठी या लॉकडाऊन मधे आज प्रचंड झटलात व शिवांशच्या अत्यावश्यक वैद्यकीय प्रवासासाठी पोलीस महासंचालक मुंबई यांचे पत्र मिळाले याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत..
राहाता येथील आमचे मित्र राजेंद्र विष्णू सोमवंशी यांच्या आठ महिन्याच्या बाळाचे (चि.शिवांश) उपचारासाठी हैदराबाद येथे 'प्री-अपॉइंटमेंट' असल्याने  वैद्यकीय उपचार घेण्यासाठी वेळेत जाणे आवश्यक होते. परंतु राहाता पोलीस, शिर्डी डी.वाय.एस.पी., अहमदनगर जिल्हा एस.पी. यांचेकडून वारंवार विनंती करुनही हैदराबाद येथे जाण्यासाठी प्रवासी परवानगी मिळत नव्हती, चालढकल सुरु होती.  संचारबंदी व लॉकडाऊन चा भोकाडी यामध्ये मानवी मुल्यांनाही 'कोरोना' डसल्याचा भास आमचे मित्र तथा शिवांशचे वडील राजेंद्र सोमवंशी यांना झाला.
पोलिसांकडे अर्ज, कागदपत्रांची पूर्तता करूनही राजेंद्र यांच्या पदरी निराशा आली. हताश राजेंद्र माझ्या घरी आल्यावर मी प्रयत्न सुरु केले. अनेक पोलीस अधिकारी तथा महसूल विभागातील अधिकारी मित्रांनी या अवघड परवानगी पत्रासाठी मुंबईकडे बोट केले.
पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रातील माझ्या काही मित्रांना याबाबत सांगितले पण कोरोनाच्या महामारीने या सर्वांना मर्यादा आल्या असल्याचे मला स्पष्ट जाणवले.
वेळ कमी आणि त्यात लॉकडाऊन यामुळे अधिकचा वेळ वाया घालवणे परवडणारे नव्हते. मग थेट युवा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश युवक  कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या कानावर घडलेला प्रकार सांगितला.
सत्यजीतदादांची कार्यालयीन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. दर तासाला फॉलोअप, संवाद आणि धीर देणारे शब्द.. यामुळे आमच्याही जीवात जीव आला. मुंबईच्या पोलीस महासंचालक कार्यालयातून दोन तासातच संपूर्ण पूर्तता करुन फोन करण्यात आला. सत्यजीतदादांचे कार्यालयात असणारे  योगेश दिवाणे यांनी समन्वय करुन रात्री 11 वाजता शिवांश आणि त्याच्या आई-वडिलांना  राहाता ते हैदराबाद प्रवासासाठी परवानगीचे पत्र मिळाले.
आणि सोमवंशी कुटुंबातील सदस्यांचे डोळे पानावले.
सोमवंशी कुटुंबियांची कोणतीही ओळख, परिचय नसताना या अतिशय अवघड परिस्थितीत राहाता तालुक्यातील 'शिवांश'ला आज मदत मिळाली. सत्यजीतदादांच्या या माणुसकीला सलाम..🙏जगतगुरू संत तुकाराम महाराजांनी अभंगा म्हटलंय  "शुद्धबीजा पोटी । फळे रसाळ गोमटी ।। मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी ।।" याचाच प्रत्यय आम्हाला आज आला.
 ... 'शिवांश'ची ही 'हैदराबाद मेडिकल जर्नी'  निर्विघ्न होण्यासाठी सत्यजीतदादांनी एक इमर्जन्सी फोन नंबरही सोमवंशी कुटुंबाला दिला आहे.  धन्यवाद दादा.🙏
Get well soon Dear Shivansh❤️
       
 - --प्रा. जयंत गायकवाड, राहाता
(शिर्डी विधानसभा मतदारसंघ)
विशेष- हे सर्व घडत असतानाच शिवांशचे वडील राजेंद्र यांनी इतरही मोठ्या प्रस्थापित पुढाऱ्यांकडे मदतीसाठी प्रयत्न करून पाहिले परंतु काही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी मला मुंबई D.G.कार्यालयाचे परवानगी पत्र मिळाल्यावर समजले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget