श्रीरामपूर ( प्रतिनिधी )- शासनाने २० तारखेपासुन काही व्यवसाय सुरु करण्यास अनुमती दिल्याची चर्चा पसरताच विनाकारण घराबाहेर पडल्येल्या नागरिकांना पोलीसांनी आपला खाक्या दाखवताच रस्ते सुनसान झाले .जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिवनावश्यक वस्तू शेतीशी निगडीत उद्योग आणी औद्योगिक प्रकल्प सुरु करण्या बाबत काही सवलती देण्याची घोषणा करताच अनेक नागरीक विनाकारण घराबाहैर पडले रस्त्यावर लोक विनाकारण फिरत असल्याचे समजाताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी
विनाकारण रस्त्यावर फिरणार्या नागरीकांना जाब विचारला काही टारगटांना प्रसादही दिला अन काही वेळातच रस्ता सामसुम झाला . अजुनही विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नका घरातच रहा सुरक्षित रहा असा सल्ला पोलीसांनी दिला आहे
Post a Comment