माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे मतदार संघात दमदार शक्ती प्रदर्शन

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.8, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यांनतर रविवार ( दि.8 ) रोजी अब्दुल सत्तार यांचे मतदारसंघात आगमन झाले. अब्दुल सत्तार यांच्या स्वागतासाठी व जन आशीर्वाद यात्रा निमित्ताने बनकीन्होळा येथून मतदारसंघात भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीची भव्यता , जय भवानी जय शिवाजीच्या जयघोष व  शिवसैनिकांच्या प्रचंड सहभागामुळे निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे भव्य असे शक्ती प्रदर्शन सिल्लोड तालुक्यात पहायला मिळाले.

हजारो वाहने आणि तमाम शिवसैनिकांच्या भव्य रॅलीने मतदारसंघ भगवे !
रँलीत जय भवानी .. जय शिवाजी चा जयघोष

माजी मंत्री अब्दुल सत्तार याच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर त्यांचे भव्य असे आगमन स्वागत व्हावे अशी सुचना शिवसैनिक व अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. सर्वांनीच त्याला होकार देत 2 दिवसात भव्य आशा रॅलीचे आयोजन केले.

सकाळी 10 वाजता अब्दुल सत्तार यांचे बाभूळगाव येथे आगमन झाले. येथूनच या रॅलीला सुरुवात झाली. पुढे केऱ्हाळा , पळशी, अंधारी, बोरगाव बाजार, देऊळगाव बाजार, घाटनांद्रा , आमठाणा , भराडी, वडोद , अंभई, उंडणगाव, अजिंठा शिवना या गावात रॅली मार्गक्रमण झाली.
  रॅली दरम्यान गावागावात छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

चौकट

 पावसातही शिवसैनिकांचा उत्साह कायम
     
सकाळी निघालेली रॅली 12 वाजण्याच्या सुमारास देऊळगाव बाजार गावात पोहोचली तेव्हा पासून  वरून राजाने दमदार हजेरी लावली. गावागावात रॅली चे स्वागत करण्यासाठी गावकरी पावसात उभे होते. तसेच रॅलीतील शिवसैनिक पावसात पूर्ण भिजून गेले होते. पावसात ही रॅली पुढे सुरू राहुध्या असा आग्रह त्यांनी धरला. शिवसैनिक व गावकऱ्यांचा उत्साह पाहून अब्दुल सत्तार यांनी ही रॅलीतील खुल्या गाडीत उभे राहून गावागावात सत्कार स्वीकारत आभार व्यक्त करीत होते.

गावागावात पुष्पांची उधळण

अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. प्रत्येकाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत गावात भव्य रॅली येत असल्याने गावागावात गावकऱ्यांनी अब्दुल सत्तार व रॅलीतील तमाम शिवसैनिकांवर पुष्पांची उधळण केली.

      सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील रहिवासी दिवंगत माधवराव बडक यांचे शिवसेना पक्षासाठी मोठे योगदान राहिलेले आहे. सदरील रॅली पळशी गावात येताच ग्राम पंचायत परिसरात  स्व. माधवराव बडक यांच्या प्रतिमेस अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.


रॅलीत यांची होती प्रामुख्याने उपस्थिती

     रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालुका प्रमुख किशोर अग्रवाल, रघुनाथ चव्हाण , नगराध्यक्षा राजश्री निकम , उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, सुदर्शन अग्रवाल, बाजार समितीचे सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण शिंदे, अजीज बागवान, माजी जि. प. सदस्य देविदास लोखंडे, यांच्यासह अजिंठाच्या सरपंच दुर्गाबाई पवार, शकुंताबाई बन्सोड , कडूबाई विठ्ठल सपकाळ,जिल्हा परिषद सदस्य सीमा गव्हाणे, मीना गायकवाड , पंचायत समितीचे सदस्य  शेख सलीम, सत्तार बागवान, निजाम पठाण, अली चाऊस , आसिफ देशमुख , बाजार समितीचे संचालक दामुअन्न गव्हाणे, सातीष ताठे, रघुनाथ मोरे ,हरिदास दिवटे , ईश्वर जाधव आदींसह नगरसेवक , विविध गावातील लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget