बुलडाणा जिल्ह्यातील माेताळा तालुक्यात असलेला पलढग प्रकल्प हा शेतकरी बांधवाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. हा प्रकल्प पावसाळ्यात लवकर भरताे भरल्यानतंर त्यातील पाणी हे नळगंगा प्रकल्पात नेण्यासाठी बुलडाणा आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचे गेल्या ३ वर्षापासुन जाेरदार प्रयत्न चालु आहेत जेनेकरुन नळगंगा धरणाची पाण्याची पातळी वाढेल व मलकापुर तसेच माेताळा तालुक्यातील हजारो शेतकरी वर्ग शेतीसाठी या पाण्याचा उपयाेग करेल या संकल्पनेतुन आमदार सपकाळ यांचे प्रयत्न चालु आहेत.
आमदार सपकाळ यांचे प्रयत्न चालु असताना काल अचानकच मलकापुरचे भाजप आमदार चैनसुख संचेती यांनी शेतकरी हिताचा विचार न करता राजकिय सुडबुध्दीतुन (श्रेयवाद) पलढग प्रकल्पाचे पाणी नळगंगा प्रकल्पाला देण्यात येवु नये अश्या आशयाचे पत्र राज्यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले.आमदार संचेती यांच्या या पत्रामुळे माेताळा व मलकापुर तालुक्यातील शेतकरी बांधवात माेठ्या प्रमाणात संतापाची लाट निर्माण झाली आहे.राजकीय डावपेच खेळतांना भाजपा आ.संचेती चूकीची मागणी करीत आहे हे त्यांच्या लक्षात कदाचित आले नसेल व याचाच फटका आगामी काळात बुलढाणा व मलकापुर या दाेन्ही विधानसभा मतदार संघात भाजप व त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला या दोन्ही मतदार संघात बसणार असल्याचे चित्र समोर येत आहे.आता पालढग धरणच्या पाण्यासाठी काँग्रेस व भाजपा अमदारा मधे जुंपली असून कोण बाजी मारतो हे पहावा लागेल.
Post a Comment