पळशी :- तालुक्यातील प्रथम सोलार बायोमेट्रीक व प्रयोगशील शाळा असा लौकिक असलेली बडकवस्ती शाळेत शिक्षकदिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन आयोजित करण्यात आला होता. शिक्षकांना दैनंदिन कामकाजात विश्रांती देत विद्यार्थ्यांनीच शालेय कामकाज सांभाळले. गटशिक्षणाधीकारी म्हणून आदित्य बडक , केंद्रप्रमुखपदी सौरभ राकडे व मुख्याध्यापीका म्हणून अनुजा तांदळे यांनी प्रशासकीय बाजू सांभाळली. वैशाली डवणे , शिवानी कुदळे , जान्हवी बडक , कल्यानी बडक , रूपाली सोनवणे, सिद्धार्थ धोंडकर, साईराज कुदळे , शिवराज बडक यांनी शिक्षक बनून विद्यार्थ्यांना शिकवले . शाळेतील स्वनिर्मित आकर्षक पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांप्रती मुलांनी कृतज्ञता व्यक्त केली..
स्वयंशासन यशस्वीपणे राबवण्यासाठी मुख्याध्यापक विशाल टिप्रमवार व सहशिक्षीका स्वाती औटी यांनी परिश्रम घेतले. गटशिक्षणाधीकारी दिलीप शिरसाठ , केंद्रप्रमुख शामराव फुसे व केंद्रीय मुख्याध्यापक रामचंद्र मोरे यांनीही छोट्या अधिका-यांचे कौतुक केले व उपक्रमाची प्रशंसा केली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण बडक व उपाध्यक्ष आबाराव बडक याप्रसंगी हजर होते.

Post a Comment