तीन कोटी २७ लाख रुपये खर्चुन एस.टी बसस्थानक पुर्नबांधणी कामाचे भुमिपूजन

शेवगाव---शेवगाव बसस्थानकांच्या नुतनीकरणामध्ये यापुर्वीचे खाजगी करणाचे बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा हे यापुर्वीच्या शासनाचे धोरण रद्द करुन शासनामार्फत परीवहन महामंडळाच्या माध्यमातून कामे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
       शेवगाव येथे तीन कोटी २७ लाख रुपये खर्चुन एस.टी बसस्थानक पुर्नबांधणी कामाचे भुमिपूजन कोनशीलेचे अनावरण परीवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज शनिवार  रोजी भर पावसात संपन्न झाले. यावेळी आ. मोनिका राजळे, विभाग नियंत्रक विजय गिते, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, नगरसेवक अरूण मुंढे, अशोक आहुजा, शिवसेना तालुकाप्रमुख अँड. अविनाश मगरे, एकनाथ कुसळकर, सुनिल जगताप, सिध्दार्थ काटे, तुषार वैदय, कचरु चोथे, गणेश कराड आदी प्रमुख उपथित होते. रावते म्हणाले की, मराठवाडयाला जोडणा-या व जिल्हयातील उत्पन्नाच्या दृष्टीने मोठे असलेल्या शेवगाव आगाराची दूरावस्था झाली होती. आ.मोनिका राजळे यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये प्रवाशाबरोबरच येथील व्यावसायिकांचीही सोय पाहिली जाईल. एस.टी मुळे दिव्यांग, जेष्ठ नागरीक, विदयार्थी यांची सोय झालेली असतांना सर्वच जण खाजगी वाहतूकीचे कौतुक करतो ते चुकीचे आहे. राज्यातील बसस्थानकांच्या मालकीच्या जागा स्वत:च्या मालकीच्या समजून अनेकजण त्याचा गैरवापर करत असल्याचे आढळून आल्याने आता राज्यशासनाने पुढाकार घेवून सर्व बसस्थानकांचा विकास महामंडळामार्फत करण्याचे धोरण अवलंबले आहे. प्रायोगिक तत्वावर सध्या १९२ ठिकाणी या पद्धतीने कामे सुरु करण्यात आली आहेत.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आगार प्रमुख वासुदेव देवराज यांनी तर प्रास्ताविक शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख भरत लोहकरे यांनी केले. तर शितल पुरनाळे यांनी आभार मानले.
प्रतीनीधी आलीम शेख
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget