सिल्लोड, प्रतिनिधी : एकीकडे गळ्यातील दागीने चोरणाऱ्यांनी महिला व पोलिसांच्या नाकीदम आणला आहे, तर दुसरीकडे ऐंशी हजार रुपये किंमतीचे दोन तोळे सोन्याचे सापडलेले दागीने तालुक्यातील पळशी येथील तरुणाने प्रामाणिक पणा व उदारता दाखवत महिलेला परत केले. हरवलेले दागीने परत मिळाल्याने विवाहीत महिलेला आनंद अश्रु अवरेनासे झाले. तरुणाची उदारता व प्रामाणिक पणाचे सर्वच कौतुक करीत आहेत.
रंजीत महेताप जोनवाळ (रा. पळशी) असे दागीने परत देणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
त्याचे झाले असे की, वर्षा पवन महेर ही विवाहीत महिला शुक्रवारी (दि. 30) दुपारी 4 वाजेच्या सुमारास आपल्या भावासोबत दुचाकीवरुन आईला भेटण्यासाठी तपोवण वस्तीकडे जात असतांना तिच्या पिशवीत ठेवलेली सोन्याची एकदानी व गहू मनी पोत रस्त्याने पडली. याच दरम्यान रंजीत जोनवाळ हा तरुण शेतातून घरी येत असतांना त्याला रस्त्यावर पडलेले दागीने सापडले.
दागीने हरवल्याचे लक्षात येताच महिलेला धक्काच बसला. तिने अधी ही बाब आईला सांगितली व नंतर पतीला. त्यांनी बराच शोध घेतला. पण दागीने सापडले नाही. शनिवारी (दि. 31) दागीने सापडल्याची माहिती तरुणाने गावातील नागरिकांना दिली व त्या महिलेचा शोध घेऊन परत करण्याचा प्रमाणिक पणा दाखवला. नागरिकांनी दागीने सापडल्याची माहिती मंदिरावरील लाउस्पिकरवरुण गावात दिली. हरवलेले दागीने सापल्याची माहीती मिळताच त्या महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. माजी उपसरपंच नारायण बडक, भाऊसाहेब बडक, सिताराम पुंगळे, रविंद्र देखणे आदींच्या समक्ष तरुणाने पत्नीच्या हस्ते महिलेला दागीने परत केले.
दागीने सापडल्याची वार्ता गावात पसरताच महिलांनी मोठी गर्दी केली होती. परंतु दागीन्याचे डिझाईन, वजन, कुठल्या रस्त्यावर हरवले याची आधी खात्री करुण घेतली. त्यानंतर महिलेला दागीने परत देण्यात आले.
Post a Comment