आमदार कांबळे यांचा राजीनामा,राजकीय वर्तुळासह काँग्रेसला जोरदार धक्का


श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी रात्री आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. 4 सप्टेंबर रोजी ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप तसेच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत चालली असून आमदार कांबळे यांच्या रूपाने नगर जिल्ह्यातील आणखी एक काँग्रेस आमदार सत्ताधार्‍यांच्या गळाला लागला आहे. दरम्यान, शनिवारी उशिरा रात्री या बातमीने राजकीय वर्तुळासह काँग्रेसला जोरदार धक्का दिला.लोकसभा निवडणुकीच्यावेळी राहात्यातील तत्कालीन काँग्रेस नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शनिवारी उशिरा सायंकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, श्रीरामपूर शहर प्रमुख सचिन बडदे यांच्यासमवेत आमदार भाऊसाहेब कांबळे एका खास विमानाने मुंबईला दाखल झाले. शिवसेनेच्यावतीने त्यांच्यासाठी पुणे येथून खास विमानाची सोय करण्यात आली होती. मुंबई येथे त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांनी आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिवसेना नेते व उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते रघुनाथ कुचिक, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, श्रीरामपूर शहर प्रमुख सचिन बडदे उपस्थित होते. आमदार कांबळे येत्या 4 सप्टेंबर रोजी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget