औरंगाबाद:भारतीय जनता पक्षात प्रवेशाला झालेल्या विरोधाने दुखावलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आज थेट मातोश्रीवर दाखल झाले अन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. विधान परिषदेत शिवसेनेला मदत केल्यानंतर सत्तार यांची सेनेसोबत जवळीक वाढली होती. गेल्या आठवडाभरात ते पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. अंबादास दानवे यांच्या संपर्कात होते. भाजप प्रवेशाचा हिरवा सिग्नल न मिळाल्याने सत्तार काल रात्रीच मुंबई ला रावण झाले. आज सकाळी मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवबंधन बांधले.
सिल्लोड भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर आ. अब्दुल सत्तार यांचा भारतीय जनता पार्टी तिल प्रवेश जवळपास अनिश्चित मानला जात होता. काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर सत्तार भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सूक होते. अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी प्रवेशाचा मार्गही सुकर केला होता. मात्र तालुक्यातील दिग्गज भाजप नेत्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला ब्रेक लावला. सुरेश बनकर, सुनील मिरकर यांच्यासह जवळपास ५० वर पदाधिकारी कार्यकर्ते थेट मुख्यमंत्र्यांना जाऊनही भेटले. त्यामुळे सत्तार यांचा प्रवेश लांबला. माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न करूनही मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांच्या प्रवेशाला हिरवा सिग्नल दिला नाही. गेल्याच आठवड्यात महाजनादेश यात्रेनिमित्त सिल्लोडला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांचा प्रवेश सोहळा होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या यात्रेतही सत्तार यांचा प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे सत्तार यांच्या कार्यकर्त्यांसह कमालीचे अस्वस्थ झाले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घ्यावा असा दबाव निर्माण झाल्यानेच सत्तार यांनी तातडीने सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे बोलले जाते.
टोकाचा विरोध...
सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला सिल्लोड तालुक्यातून टोकाचा विरोध होत होता. अनेक जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याने भाजप वरिष्ठ सावध झाले. गेली वीस वर्ष सत्तार भाजप विरोधात लढत आले आहेत. त्याची सलही अजून कार्यकर्त्यांच्या मनात ताजी आहे. परिणामी सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जाते.
दरम्यान अब्दुल सत्तार काल रात्रीच तातडीने मुंबईला रवाना झाले. मोजक्या कार्यकर्त्यांसह सत्तार आज सकाळी मातोश्रीवर पोहोचले अन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Post a Comment