राहुरी प्रतिनिधी,
देवळाली प्रवरा येथे दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी सोपान वरखडे यांच्या वस्तीवरील कुञ्याची शिकार करुन शिकार घेवून जात असताना एक दिड वर्ष वय असलेला बिबट्या संजय साविञा वरखडे यांच्या शेतातील विहीरीत पडला. सोमवारी दुपारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहीरीत पिंजरा सोडून बिबट्यास बाहेर काढले आणि डिग्रस येथील नर्सरीत त्याच्यावर उपचार करण्यासाठी घेऊन गेले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथील वाणी वरखडे वस्ती वरील संजय साविञा वरखडे यांच्या शेतातील विहीरीत दिनांक २ सप्टेंबर रोजी राञी एक बिबट्या कुत्र्याची शिकार घेवून जात असताना विहीरीत पडला. जिव वाचविण्यासाठी बिबट्या बराच वेळ विहीरीच्या कपारीवर बसुन होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लहानबाई संजय वरखडे या शेतात चारा काढण्यासाठी गेल्या. चारा काढीत असताना विहीरीतून बिबट्याचा गुर गुरण्याचा व डरकाळी फोडल्याचा आवाज आल्याने लहानबाई यांनी विहीरीत डोकावून पाहीले असता विहीरीतील कपारीवर बिबट्या दिसताच त्यांनी मोठ्याने आरडा ओरडा करुन त्यांनी पती संजय वरखडे यांना बिबट्याची माहीती दिली. त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना माहिती दिली. नगराध्यक्ष कदम यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
घटनास्थळी वन विभागाचे वनपाल गोरक्षनाथ लोंढे, सचिन गायकवाड, वामन लांबे, बाळासाहेब दिघे, जयराम सागर, प्रदीप कोहकडे, लक्ष्मण किनकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. वरखडे शेतातील विहीरीतील बिबट्याची पाहणी करुन उपस्थित शेतकऱ्यांच्या मदतीने विहीरीत पिंजरा सोडुन बिबट्यास जेरबंद करण्यास यश मिळविले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातून पिंजरा काढणे अवघड होते. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी स्वतःचे वाहनाच्या साहय्याने पिंजरा बाहेर काढण्यास मदत केली. यावेळी नगराध्यक्ष कदम पुर्णपणे चिखलाने भरले होते. मात्र बिबट्यामुळे कोणालाही ईजा होऊ नये. यासाठी त्यांनी कसलाही विचार न करता चिखलात उभे राहून मदत कार्य केले.
यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पञकाशी बोलताना सांगितले की, मी व उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सचिन ढुस यांच्यासह प्रभाग क्रमांक ५ मधील रस्त्यांची चालू असलेली कामे पाहणी करीत असताना वाणी वरखडे वस्ती वरील नागरीकांनी विहीरीत बिबट्या पडल्याची माहीती मोबाईल द्वारे दिली. तात्काळ त्या ठिकाणी पोहचून काय मदत करता येते ते पाहिले. नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी शेतात साचलेले होते. कोणतेही साधन घातले तरी ते चिखलात फसणार होते. त्यामुळे स्वतः कडील रेसर जीप चिखलात घालून स्वतः पिंजरा शेता बाहेर काढण्यास मदत केली. राजकारणाच्या वेळी राजकारण करायचे आणी मदतीच्या वेळी मदत करायची हे माझे कर्तव्य आहे, असे कदम यांनी सांगितले.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकरी व नागरीक जगन्नाथ वरखडे, चेतन कदम, कारभारी वरखडे, मंजाबापू वरखडे, प्रदीप नालकर, अभिजित नालकर, बाळासाहेब वरखडे, मयुर मोरे, संदीप कदम, सुनिल खांदे, राजेंद्र मोरे, सतिष वाजे, आदेश जाधव, मनोज डोंगरे आदींनी मदत केली.

Post a Comment