मोदीजी युवा संघटन च्या वतीने ना. विखे यांचा नागरी सत्कार संपन्न..

 विठ्ठल गोराने/श्रीरामपूर शनिवार दिनांक 7/ 9 /019 रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार सोहळा मोदीजी युवा संघटन च्या वतीने सय्यद बाबा चौक श्रीरामपूर याठिकाणी मोठ्या थाटात संपन्न झाला.
      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती दीपक आन्ना पठारे हे होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, श्यामलीग शिंदे ,मुक्तार शहा ,उपसभापती बंडू तोरणे, जि. प .सदस्य शरदराव नवले,  रमजान शहा ,याकूब शहा, मुन्ना पठाण, अकिल शेख ,लहू कानडे, भाऊसाहेब डोळस ,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोदीजी युवा संघटन चे राष्ट्रीय महासचिव बरकत अली शेख यांनी केलेले. सूत्रसंचालन प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागिरदार यांनी केले .या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अश्फाक खान ,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  श्रीहरी बहिरट, श्रीरामपूर तालुका  पोलीस निरीक्षक मसुद खान ,या अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ना .विखे यांच्या हस्ते सन्मानित करून गौरव करण्यात आला.
 या सत्कार  सोहळ्यास उत्तर देतांना ना.विखे यांनी सांगितले की  सध्या देशा चे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नव भारताची ची निर्मिती करून भारताला जगात महासत्ता बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू केले आहे. त्यांचे हात बळकट करणे करिता जनतेने सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहावे तसेच मोदीजी युवा संघटन च्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठबळ देण्याचे कार्य देशभरातून मोठ्या प्रमाणात केले जात आहे .त्याचप्रमाणे या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी  पक्षाचे हात बळकट करण्याबरोबर जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करावे व  माझे त्यांना सदैव सहकार्य राहणार आहे. श्रीरामपूर तालुका मी दत्तक घेतलेला आहे व सर्व समाजातील लोक एकत्र जोडून तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने माझी वाटचाल राहणार आहे. असे ना विखे यांनी सांगितले. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना महिलांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
       या प्रसंगी मोदीजी युवा संघटन चे प्रदेश संघटक- विठ्ठल गोराणे ,राजेंद्र त्रिभुवन, रमजान शेख ,अमजद शेख ,फकीर मोहम्मद, अमीर बेग मिर्झा, रणजीत जामकर, लक्ष्मण उइके, शब्बीर कुरेशी ,डीएम भारस्कर, बाळू सिंग टाक, मुबारक शेख, देविदास देसाई ,रवि भालेराव, सलमा जागीरदार ,ज्योती आढाव, शाहिस्ता शेख, सुमन शेळके, ज्योती गोसावी, उमापमॅडम आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget