मुळा उजव्या कालव्याला उंबरेनजिक भगदाड.

राहुरी तालुक्यातील उंबरे मुळा उजवा कालव्याला भगदाड पडल्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सुरू झाल्याने तातडीने कालवा बंद करण्याचे आदेश मुळा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता मोरे यांनी दिले.दरम्यान, काही अज्ञात विघ्नसंतोषींनी नजिकच्याच लिफ्टच्या पाईपलाईनमध्ये जिलेटीनच्या कांड्याच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला असून शेतकर्‍यांचे पाणी बंद करण्याचे षडयंत्र असल्याची चर्चा होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.मुळा उजवा कालवा 1650 क्युसेकने सुरू आहे. परंतु उंबरे येथील पेटीपुलाशेजारीच एक ससे-गांधले वस्तीचे लिप्ट आहे. ते अनेक वर्षांपासून बंद आहे. त्या लिफ्टच्या बार्‍याशेजारीच काल रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी सांयकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास त्या बोगद्यातून गढूळ पाणी बाहेर निघाल्याचे शेतकर्‍यांच्या लक्षात आले. त्यावेळी शेतकर्‍यांनी समक्ष पाहिल्यामुळे त्यांनी तातडीने ही माहिती संबंधित अधिकार्‍यांना कळविली. अभियंता मोरे यांनी कालवा बंद करण्याचे आदेश दिले. अधिकार्‍यांना माहिती मिळताच शाखा अभियंता पद्मसिंह तनपुरे, शाखा उप अभियंता सायली पाटील व या विभागाचे सर्व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हे संपूर्ण पाणी करपरा नदीमध्ये सुरू आहे. भगदाड पडल्याचे लवकर लक्षात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.ससे-गांधले लिप्टच्या पाईपमधून बाहेर पडणारे पाणी करपरा नदीला येत आहे. त्या पाण्याचा अनेक शेतकर्‍यांना फायदा होतो. हे काही समाज कंटकांना सहन न झाल्याने काही अज्ञात इसमांनी त्या लिप्टच्या पाईपमध्ये मुळा कालव्याला पाणी येण्या आधीच जिलेटीनच्या कांड्याच्या सहाय्याने स्फोट घडवून त्यांनी त्या पाईपशेजारी मोठे भागदाड पाडल्याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये चालू आहे.शेतकर्‍यांच्या चिंतेत भर
मह्न्यिापासून गरजेइतका पाऊस पडलेला नाही. बाजरी, सोयाबीन व अन्य पिके आता करपू लागली आहेत. मुळा कालव्यातून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर शेतकर्‍यांना आशेचा किरण होता. पण या घटनेने शेतकरी आणखी वैतागला आहे. एकतर जायकवाडीला मोठ्या प्रमाणात फुटकचे पाणी वाहून गेले आहे. पण नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आवर्तन देण्यात येत आहे. त्यासाठी पट्टी वसूल केली जात असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget