नगर प्रकरनातील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी,नगरकर त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर.

अत्याचाराच्या गुन्ह्यात शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा कुठलाही संबंध नसून ते बेदाग असल्याचा दावा करत नगरकर त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. फुलसौंदर यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी शिवसेना, राष्ट्रवादी, समता परिषदेसह सामाजिक संघटनांनी आज पोलिसांकडे केली.भगवान फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर व इतर पाच अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून सामूहिक अत्याचाराचा 376 (ड) यासह अ‍ॅट्रॉसिटीची कलम गुन्ह्यात लावली आहेत. ‘बकर्‍या चारण्यासाठी गेलेल्या महिलेला गाठून जमिनीचा वाद मिटवायचा आहे की नाही असे म्हणत आरोपींनी मारहाण केली. मारहाणीत अर्धवट बेशुध्द पडलेल्या महिलेवर गणेश आणि महेश फुलसौंदर यांनी अत्याचार केला’ अशी फिर्याद दाखल झाली आहे. गुन्हा दाखल होताच नगरकर फुलसौंदर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. राष्ट्रवादीने माळीवाड्यात निषेध सभा घेत कोतवाली पोलिसांना निवेदन दिले, तर शिवसेनेने मोर्चाने जात पोलिसांनी निवेदन दिले तुमच्या पत्राची गरज नाही, सेना खंबीर अनिल राठोड । नामोल्लेख टाळून जगतापांवर निशाना
गुन्हेगारांच्या टोळ्या पोसून त्या माध्यमातून सज्जनाला त्रास द्यायचा, खंडणी उकळायची. पोलिसांना पत्र देऊन सहानुभूतीसाठी आव आणायचा. मात्र तुमच्या आपुलकीची आम्हाला गरज नाही, शिवसैनिकाला सांभाळण्यासाठी शिवसेना खंबीर असल्याचा एल्गार करत माजी आमदार अनिल राठोड यांनी आज पुन्हा एकदा राजकीय विरोधक आमदार संग्राम जगताप यांच्यावर नामोल्लेख टाळून निशाणा साधला. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाचजणांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांनी पत्र देऊन चौकशीची मागणी केली. आज सोमवारी शिवसेनेने भगवान फुलसौंदर यांच्यावरील अन्यायाविरोधात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. शिवालय येथून निघालेला मोर्चा कापडबाजार मार्गे कोतवाली पोलीस ठाण्यात पोहचला. तेथे ठिय्या देत अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget