सिल्लोड, प्रतिनिधी : तालुक्यातील सिल्लोड- भराडी रस्त्यावर बैलगाड्यांची (तांगे) शर्यत लावून ती जिंकण्यासाठी बैलांना अमानुष मारहाण करणाऱ्या दोघांवर सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात पोलिसांनी चार बैल, दोन गाड्या असा ऐकूण 66 हजारांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तालुक्यातील मोढ़ा फाट्यावर करण्यात आली.
सोमिनाथ पांडुरंग दूधे (35) रा. खोडकाईवाडी, विलास देविदास कुदळ (24) रा. रजाळवाडी, सिल्लोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शनिवारी तालुक्यातील भराडी येथील आठवडी बाजार असल्याने पोलिस नाईक दादाराव पवार, चव्हाण बाजार गस्तसाठी जात होते. या दरम्यान सिल्लोड- भराडी रस्त्यावरील मोढा फाट्याजवळ काही नागरिक बैलगाड्यांची लावलेली शर्यत जिंकण्यासाठी बैलगाड्या पळवत होते. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता. पोलिसांनी पाठलाग करुण बैलगाड्या पळवणाऱ्या थांबवून त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी बैलांची पाहणी केली असता पाठीवर काठीने मारल्याचे व्रण दिसून आले. शिवाय आरु (लोखंडी खिळा) टोचून जखमा केल्याचे ही निदर्शनास आले. पोलिसांनी बैलगाड्या पळवणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment