सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात अभिनव प्रतिष्ठाण द्वारा मदत साहित्य
वाटप---नदी काठच्या पंधराशे हून कुटुंबास जीवनावश्यक वस्तू वितरीत
-प्रतिनिधी(सिल्लोड)-सांगली जिल्हयात कृष्णा नदी काठच्या शेकडो गावांना
मुसळधार पाऊस व महापुराचा तडाखा बसून हजारो कुटुंबाची वाताहत झाली.10 फुटा
पर्यंत घरात पाणी गेल्याने घरातील सर्व वस्तू, अन्नधान्य, कपडे निरुपयोगी
झाले व काहींचे तर सर्व सामान वाहून गेले.शेतीचे अतोनात नुकसान झाले.
या पूरग्रस्त बांधवांना मदतीचे कर्तव्य म्हणून सिल्लोड
येथील अभिनव प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेतर्फे शहरात व तालुक्यातून मदत
साहित्य व आर्थिक मदत जमा करण्यात आली होती.लाखाहून अधिक रक्कम या कामी जमा
झाली व त्यातून नवीन उबदार ब्लॅंकेट, चादर, बेडशीट ,, परकर ,सॅनिटरी पॅड
आदींची खरेदी करण्यात आली. शहरातुन अनेकांनी साड्या, साबण,टॉवेल,मंजन,खाद्य
वस्तू आदिंची मदत या साठी झाली.संस्थाध्यक्ष व मा. उपनगराध्यक्ष किरण पा.
पवार यांच्या नेतृत्वाखाली दि. 15 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला हे साहीत्य
कृष्णा नदीकाठच्या पळूस तालुक्यातील औदुंबर वस्ती,अंकल खोप, बोरबन,चोपडे
वाडी या गावात घरोघरी जाऊन गरजूंना वितरित करण्यात आले.सुमारे दीड हजार
कुटूंबाना ही मदत पोचती केली गेली. या मदतीने गावकऱ्यां मोठा दिलासा
मिळयाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.संस्थेचे किरण पवार,विजय
चव्हाण,डॉ. संतोष पाटील, पवन दौड,निलेष कुलकर्णी, आनंदा खेत्रे,बंडू भाऊ
पालोदकर,विजय डिडोरे,संतोष अरसुळ या सोबत सातारा येथील तुषार तोटे,बोरबनचे
सागर मोरे,औदुंबर चे समीर पाटील, अनील पाटील यांनी अविरत परिश्रम घेतले.
प्रतिक्रिया-सिल्लोडच्या अभिनव् प्रतिष्ठाण या संस्थेने आमच्या पूरग्रस्त
गावात केलेली मदत खुप मौलिक ठरलेली आहे.आमचे कृष्णा नदी काठी गावं असून
घरातील बरंच सामान पुरात वाहून गेलं व या वेळी हा मिळालेला मदतीचा हात सदैव
आठवणीत राहील-सागर मोरे (ग्रामस्थ)बोरबन ता. पळूस जि. सांगली
Post a Comment