येथील मानोरा
चौकातील रस्त्यावर खड्डे वाढले असुन या खड्ड्यांचा नागरिकांना होत असलेला
त्रास पाहून त्या रस्त्यातील खड्ड्यात कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी
बेसरमाचे झाड लावून निषेध केला.
येथील
दिग्रस-दारव्हा महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून रखलेले असुन ते काम
अद्यापही पूर्ण झालेले नाही. शहरातील मानोरा चौकातील रस्ता सुद्धा
दिग्रस-दारव्हा महामार्गाचे काम मिळालेल्या कंत्राटदारालाच मिळालेले आहे.
त्याने दोन आठवड्यांपूर्वी पाऊस चालु असतांना त्या रस्त्यावरील खड्डे वाळू
मिश्रित सिमेंट, आणि निकृष्ट साहित्य वापरून बुजविण्याचा केविलवाना प्रकार
केला होता. मात्र पाऊस सलग चार-पाच दिवस आल्याने तो रस्ता चिखलमय झाला
होता. त्यामुळे त्या रस्त्यावरून ये-जा करतांना वाहनधारक आणि पादचाऱ्यांना
कसरत करावी लागत होती. रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या अंगावर चिखल, पाणी उडणे
नित्याचेच झाले होते. नागरिकांची होत असलेली दुरावस्था आणि शासनाच्या
दुर्लक्षित धोरण याचा निषेध म्हणून कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांकडून मानोरा
चौकातुन दारव्हाकडे जाणाऱ्या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये बेसरमाचे झाड
लावण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपासून दिग्रस-दारव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने
रखडलेलेच आहे. सुरुवातीला रस्त्याचे डांबरीकरण होत होते. तो रस्ता बनवणे
थांबवून मग सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. पण या
कंत्राटदाराचे काम अतिशय कासव गतीने सुरु असुन दिग्रस ते दारव्हा रस्ता
ठिकठिकाणी उखडून ठेवलेला आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करून
वाहनधारकांना होत असलेला त्रास कमी करण्याची मागणी यावेळी कॉंग्रेस च्या
कार्यकर्त्यांनी केली.
दारव्हा
येथे महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असतांना
आम्ही त्यांना दिग्रस-दारव्हा राज्यमहामार्गाच्या दुरुस्तीबाबत निवेदन
देण्याकरिता जात असतांना पोलिसांनी आम्हाला अटक करून मुख्यमंत्र्यांची सभा
होईपर्यंत नजरकैदेत ठेवले होते. शासन आपल्याजवळ असलेल्या सुविधांचा
दुरुपयोग करित असल्याचा ठपका देखील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी लावला.
या आंदोलनात काँग्रेसचे दिग्रस विधानसभा युवक अध्यक्ष नंदराज
ठाकरे,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अरबाज धारिवाला,दत्ता मुडे, विजय
गुघाणे,जमीर खान,फैसल पटेल,सोहेल शेख,बाबा पटेल,अहमद अली, मोनू
मक्तेदार,राजेंद्रसिंह चौहान,मुरलीधर कांबळे यांचा समावेश होता.
Post a Comment