गुरुनानक देवजी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त (गुरुपूरब) बिदर-कर्नाटक
येथून निघालेल्या 'प्रकाश पूरब यात्रे'चे शुक्रवारी (१६ ऑगस्ट) नगर शहरात
आगमन झाले. येथील शिख-पंजाबी समाजबांधवांसह विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी
संस्थांच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले.
नोव्हेंबर २०१९
मध्ये गुरुनानक देवजी यांची ५५० वी जयंती साजरी होणार आहे. यानिमित्ताने
त्यांनी दिलेली शिकवण समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी 'प्रकाश पूरब' यात्रा
निघाली आहे. देशातील १९ राज्यांतून ती प्रवास करणार आहे. नगर शहरामध्ये
सक्कर चौकात शिवसेनेच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. शिवसेना
उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, नगरसेवक योगीराज
गाडे, अनिल कराळे, गिरीश जाधव, समीर बोरा, भगवान फुलसौंदर, नाना गाडे,
युवराज गाडे आदी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर सथ्था कॉलनी येथे गुजराथी
युवा मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले. यात्रेतील भाविकांना या वेळी मिठाई
देण्यात आली. मगनभाई पटेल, सुधीर मोता, विपीन विरानी, मुकेश कांकिया, पंकज
पंड्या, जिग्नेश सोलंकी, विपुल शाह, देवांग मेहता, अमित जंगला, राहुल
मोता, चेतन नयानी, जिग्नेश कांकीया, हिना पटेल आदी या वेळी उपस्थित होते.
Post a Comment