दिल्लीतील एम्स रूग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाचा पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या अग्नीशमन दलाच्या ३४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या
अनेक दिवसांपासून रुग्णालयात इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. त्यामुळे शॉर्ट
सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Post a Comment