अभिमानास्पद!दिपाली भोसले-सय्यद फाउंडेशन कडून पूरग्रस्त भागातील १००० मुली दत्तक.

सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक लोक, विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावत आहेत. जिवनावश्यक वस्तून पासून ते आर्थिक मदत पोहचवण्याचे काम सर्व स्तरावरून सुरु आहे. अशातच मराठी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद फाउंडेशन कडून पूरग्रस्तांसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकतेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून दीपालीने लोकांची भेट घेत हा निर्णय घेतला.तसेच पूरग्रस्त भागातील 1 हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी देखील घेतल्याच दिपालीने जाहीर केले आहे. पूरग्रस्त भागातील प्रत्येक मुलीच्या नावाने 50 हजार रुपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे. अशा एकूण 1000 मुलींचा विवाह करून देण्याची जबाबदारी दीपालीने स्वीकारली आहे.काही दिवसांपूर्वी अहमदनगर मधल्या साकळाई उपसा सिंचन योजना मंजूर करून काम सुरू करावे या मागणीसाठी दीपालीने बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर दीपालीने आपले उपोषण मागे घेतले होते. या योजनेमुळे श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातल्या दुष्काळी 35 गावांना फायदा होणार आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget