कर्जाच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या.

प्रतिनिधी :
सिल्लोड तालुक्यातील वांगी खुर्द येथील शेतकरी सुनिल भिमराव म्हस्के यांनी (दि 12) रोजी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
सततची नापिकी ,दुष्काळ, पावसाच्या लहरीपणामुळे आपल्या जवळ असलेली साडेचार एकर जमीन असुन शेतीत काबाड कष्ट करणाऱ्या सुनिल भिमराव म्हस्के यांनी सोसायटीकडून काही कर्ज घेतले होते याशिवाय नातेवाइकांकडून काही उसनवारी घेतले होते,मागील तीन वर्षापासून शेतीसाठी बी-बियाणे, खते व औषधी उसनवारी घेऊन आपल्या शेतात या वर्षी चांगले उत्पन्न होईल या अपेक्षेने या शेतकऱ्याने दुकानदारांकडून देखील उसनवारी सामान घेतले होते. वाढणारे व्याज व हवे तेवढे उत्पन्न होणार नसल्याचे समजल्याने व त्यांच्यावर असलेले अंदाजे दोन-अडीच लाख कर्ज फिटणार नसल्याने नैराश्यातून सुनिल म्हस्के यांनी पत्नी शेतात कामासाठी व मुले बाहेर गेली असतांना दिनांक 12 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सुनील म्हस्के हे घरातील एकटे कर्ते पुरुष होते, त्यांच्या पश्चात पत्नी, आई ,मुलगा व मुलगी असा परिवार आहे सदर घटनेचा तलाठी व पोलीस बिट जमादार यांनी गावणाऱ्यांसमक्ष पंचनामा करून जवाब नोंदवून घेतला आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करण्यासंदर्भात युवा नेते अब्दुल समीर यांनी मा.तहसीलदार सिल्लोड यांना विनंती केली.
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात झाले शवविच्छेदन...
सदर आत्महत्येची माहिती मिळताच गावकऱ्यांनी प्रेत शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रूग्णालयात आणले असल्याची माहिती मिळताच अब्दुल समीर,राम सरोदे,फहिम पठाण,सांडू महाकाळ ,अनिल महाकाळ,हरी मुरकुटे,योगेश म्हस्के,शेख इकरार यांनी धाव घेऊन सहकार्य केले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget