नवी दिल्ली - दिल्ली
पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीने फोन करुन माझी पत्नी आत्मघातकी आहे ती दिल्ली
विमानतळावर बॉम्बस्फोट घडविणार आहे असा संदेश दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. या फोननंतर दिल्ली
पोलिसांची पळापळ झाली. मात्र अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.
या अज्ञात व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी दिल्ली
विमानतळावर
बॉम्बस्फोट घडविण्यासाठी गेली आहे. पोलिसांनी संबधित घटनेची चौकशी
केल्यानंतर या व्यक्तीने लोकांमध्ये दहशत पसरविण्यासाठी असं कृत्य केल्याचं
समोर आलं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या व्यक्तीला अटक केल्यानंतर
ही माहिती उघड झाली.
Post a Comment