पीएमपी बसचा ब्रेक निकामी, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघात टळला

पुणे :
 दरम्यान भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या साह्याने बस बाजूला घेतली. ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.
बीआरटी मार्गाने लोहगावकडे जाणाऱ्या कात्रज आगाराच्या बसचे भारती हॉस्पिटलसमोर ब्रेक निकामी झाल्यानंतर केवळ चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजता घडली. बीआरटी मार्गावरील लोखंडी दूभाजकाला धडकून बस थांवण्यात चालक यशस्वी ठरल्यामुळे मोठा अनर्थ टळला. क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला घेण्यात आली. दरम्यान सातारा रस्त्यावर मंदावलेली वाहतूक सुरळीत झाली.कात्रज आगारामधील चालक विष्णू होंडे हे सकाळी बस ( एमएच.१२ एफसी. ३२९३) लोहगाववरुन एक फेरी मारुन आले होते. दुसरी फेरी साठी त्यांनी सकाळी ९.३० वाजता बस मार्गावर आणली. त्यावेळी बसमध्ये जवळपास पन्नास प्रवासी होते. भारती विद्यापीठचा उतार सुरू झाल्यानंतर ब्रेक निकामी झाल्याचे चालक विष्णू होंडे यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ओरडून नागरिकांना बाजूला होण्यास सांगितले. आणि गाडी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर घातली . फुटपाथवर असलेल्या बाँलोर्डला धडकून गाडी थांबेल असा चालकाचा अंदाज होता. मात्र बाँलोर्ड तोडून गाडी पुढे गेली. पुढे पन्नास फुट खोली होती. आणि त्या खाली असलेल्या रस्त्यावर फेरीवाल्यांचा सात आठ गाड्या आणि नागरिकांची वर्दळ होती. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान दाखवत बस उजव्या बाजूला असलेल्या बीआरटी मार्गावर घातली. तीव्र उतार असल्याने बस वेगात होती. त्यामुळे बस जवळपास सत्तर ते ऐंशी फुट लोखंडी दूभाजक तोडत तोडत पुढे जाऊन थांबली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget