
नवी दिल्ली -खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांच्या पत्नीने कन्हैय्याकुमार यास क्लिनचीट दिली आहे. खासदार जामयांग यांच्या पत्नीही दिल्ली विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी आहेत. विशेष म्हणजे, ज्यावेळी दिल्ली विद्यापीठात घोषणाबाजीचा प्रकार घडला. त्यावेळी, त्या विद्यापीठातच होत्या. तर, कन्हैय्या कुमार तेथे उपस्थित नव्हता. केवळ, विद्यार्थी संघटनेचा नेता असल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. जे घडलं ते चुकीचं घडलं, असं जामयांग यांच्या पत्नीनं म्हटलं आहे.
आपल्या एकाच भाषणानंतर देशभर प्रसिद्धीस आलेले लदाखचे
कन्हैय्या कुमारसोबत चुकीचं घडलं, तसेच उमर खालिद यांच्याही बाबतीत चुकीचं घडलं आहे. तेव्हापासून त्यांची प्रतिमा खराब बनली असून लोक त्यांना नावं ठेवतात. माझा एक भाऊही जो, जनावरांचा डॉक्टर आहे, तोही न्यूज चॅनेल्सवर कन्हैय्या कुमारला पाहिल्यानंतर त्याला दोषी मानतो, सर्वसामान्य जनतेला जे दाखवलं ते चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आलं, असे खासदार जामयांग यांच्या पत्नीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. म्हणजेच, एकप्रकारे जामयांग यांच्या पत्नीने कन्हैय्या कुमारला क्लीनचीट दिली आहे.
Post a Comment