मनिषा कोईराला
हिने नुकताच ४९वा वाढदिवस साजरा केला. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या
‘सौदागर’ चित्रपटातून मनिषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु त्यानंतर
मनीषाच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर
मनीषाने ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स
ऑफिसवर चांगली कमाई केली आणि मनीषा लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने अग्नि
साक्षी, इंडियन, गुप्त: द हिडन ट्रूथ, कच्चे धागे, कंपनी आणि एक छोटी सी लव
स्टोरी या चित्रपटांमध्ये काम केले.
नाना पाटेकर यांनी अग्निसाक्षी या चित्रपटात मनिषा कोईराला
सोबत काम केले होते. या चित्रपटाच्या दरम्यान नाना आणि मनिषा एकमेकांच्या
प्रेमात पडले असल्याच्या बातम्या त्या काळात मीडियात चांगल्याच गाजल्या
होत्या. एवढेच नव्हे तर ते दोघे लग्न देखील करणार होते.
Post a Comment