
पणजी -पावसाळ्याचा मोसम असला तरी, गोव्यात जलवाहिन्या फुटू लागल्याने
पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तिसवाडी आणि फोंडा या
दोन तालुक्यांमधील नळ गेले तीन दिवस कोरडे आहेत. जलवाहिन्या दुरुस्त
करण्याचे काम सुरू आहे. कदाचित रविवारी रात्रीर्पयत किंवा सोमवारी दुरुस्ती
काम पूर्ण होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.फोंडा
तालुक्यात जिथे भींत पडून दोन जलवाहिन्या फुटल्या तिथे भींत पडू शकते याची
कल्पना लोकांना आली होती. जोरदार पाऊस होता व त्यामुळे भींत पडेल आणि
जलवाहिन्या फुटतील हे कळत होते. पण, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या
अभियंत्यांना त्याची कल्पना आली नाही. जलवाहिन्यांखाली मातीच नव्हती.
जलवाहिन्या वर होत्या, त्यांना खाली कोणता आधार नसल्याने त्या फुटतील हे
कळून येत होते, अशी चर्चा सोशल मीडियावरही सुरू आहे.
Post a Comment