कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील मुख्याध्यापक नागोराव कोंडिबा काकळे हे काही दिवसांपासून विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याचा आरोप होत होता. मुली भयभीत झाल्यामुळे काही मुलींनी शाळेत जाणे सोडले होते. त्यातील काही मुलींनी हा प्रकार सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी सकाळीच मुख्याध्यापक काकळे यांना एका खोलीत मारहाण केली. पोलीस पाटील नीलेश बलसाने आणि इतर नागरिकांनी काकळे यास सोडवले. यानंतर पिसोर ठाण्यात तक्रार देण्यात आली. मुख्याध्यापक काकळे याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद करून अटक केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी सांगितले.
Post a Comment