अकोले तालुक्यात सलग दोन बिबटयाचा मृत्यू,वनविभागाने मात्र तोंडावर बोट

अकोले तालुक्यातील रुंभोडी येथे काल रविवारी सकाळी 9 च्या सुमारास एक बिबटया मृतावस्थेत आढळला. सलग दुसर्‍या दिवशी अकोले तालुक्यात बिबटयाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नैसर्गिक की घातपाती याबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आले असून वनविभागाने मात्र तोंडावर बोट ठेवून शांत बसणेच पसंत केले आहे. तालुक्यात शनिवार रेडे शिवारातही एक बिबटया मृत अवस्थेत आढळून आला होता रुंभोडी येथील हाडवळा वस्ती परिसरात राहणारे नाना गायकवाड यांच्या शेतामध्ये काल रविवारी सकाळी 9च्या सुमारास 4 वर्ष वयाचा नर जातीचा बिबटया मृतावस्थेत असल्याचे गायकवाड यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वनरक्षक ज्ञानेश्‍वर कोरडे, उपसरपंच बाळासाहेब मालुंजकर, पोलीस पाटील गोरक्ष शिंदे यांना याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर वनखात्याचे कर्मचारी व अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबटयाचा पंचनामा केला. बिबटयाचा मृत्यू 1 ते 2 दिवसांपूर्वी झाला असून त्याचे शरीर पुर्णपणे फुगून आले होते. सदर बिबटया 4 ते 5 वर्ष वयाचा असून नर जातीचा होता.मृत बिबटयाचे सुगाव रोपवाटीकेत पशुवैद्यकिय अधिकारी आर. डी. भांगरे यांनी शवविच्छेदन केले व त्याचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. घटनास्थळी वनपरीक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले, वनपाल लक्ष्मीकांत शेंडगे, वनरक्षक ज्ञानेश्‍वर कोरडे, वनमजूर त्रिंबक देशमुख, अनिल सावंत, शशि गायकवाड, बापू सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. बिबटयाच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत बिबटयाचा सुगाव रोपवाटीकेतच अंत्यविधी करण्यात आला.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget