सिल्लोड(प्रतिनिधी)
सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्या वरून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी लगेचच मंगरूळ अन्वी, डोंगरगाव, ठालेवाडी, आव्हाना, वरुड, पिंप्री, पिंपळगाव पेठ या भागात उजव्या कालव्याद्वारे सोडून या अतिरिक्त पाण्यावर काळव्यालगत असलेल्या मंगरूळ वरुड पिंप्री, पिंपळगाव पेठ पाझर तलावासह येथील सिमेंट बंधाऱ्यात व तसेच पूर्णा नदीवरील पिंपळगाव पेठ, गव्हालीतांडा, तांदुळवाडी जैनपूर कोठारा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये सोडण्यात यावे, यामुळे निल्लोड अशी मागणी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना निवेदनाद्वारे केली या निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे तालुका सरचिटणीस नारायण बडक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
सिल्लोड तालुक्यातील निल्लोड मंडळात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी नाले विहरी कोरडे पडले असून पाऊस न पडल्यामुळे गंभीर पाणी टंचाई निर्माण होणार आहे खेळणा धरणातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी उजव्या कालव्याद्वारे या परिसरात सोडल्यास या परिसरातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे पूर्ण क्षमतेने भरू शकता यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढून या पाण्याचा निल्लोड मंडळातील गावामध्ये पिण्यासाठी व सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते अशी मागणी निवेदनात केली आहे.
Post a Comment