औरंगाबाद प्रतीनीधी:-
माणूस म्हणून जन्माला येणे हा निव्वळ योगायोग असतो. पण माणूस म्हणून मरणे ही मात्र जन्मभराची कमाई असते. अशीच जन्मभराची कमाई करुन ठेवणाऱा आणि रंजल्या - गांजलेल्यांना जमेल तशी मदत करणारा औरंगाबादच्या सुमीत पंडित नावाच्या तरुणाने समाजासमोर आदर्श उभा केलाय. नुकतीच सुमित पंडीत यांची माजी उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांच्याशी भेट झाली.अभ्यासू व्यक्तीमत्व असलेले दादांना सुमितच्या कार्याची चांगलीच दखलपात्र माहीती होती. ही बाब अभिमानास्पद तर आहेच शिवाय आश्चर्यचकित करणारीही आहे. चतुरस्त्र व्यक्तीमत्वाचे दादा म्हणाले " महाराष्ट्रातील निस्वार्थपणे काम करणाऱ्या मोजक्या व्यक्तांमध्ये सुमित पंडीत यांची गणना होते. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असो की रंजल्या गांजल्यांची , मनोरूग्नांची दाढी कटींग असो सर्वच ठिकाणी हा व्यक्ती हजर असतो ". एका वयोवृद्ध महिलेचे उदाहरण देतांना दादांनी उल्लेख केला की तिन मुले असणाऱ्या मातेला मुलांनी सोडून दिले मात्र रक्ताचे नाते नसलेला सुमित पंडीत व त्याचा परीवार माणुसकीच्या नात्याने या माऊलीसाठी झटत आहे. सत्तेत असतांना दादांनीही असाच माणुसकीचा प्रत्यय देणारा अनुभव कथन केला. सु-लक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना कशी झाली त्याविषयीची माहिती सुमित पंडीत यांनी दादांना दिली. कुठल्याही स्वयंसेवी संस्थेची मदत न घेता सुमित पंडीत व त्यांची टिम जी अहोरात्र सेवा करत आहेत त्यास महाराष्ट्रात तोड नाही असे गौरवोद्गार दादांनी काढले.
आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून तो निस्वार्थीपणे गरजू, दूर्लक्षीत, हतबल, निराधार माणसांची सेवा करतो आहे. विशेष म्हणजे त्याच्या या कार्यात त्याचे कुटुंबीयही सहभागी आहेत. Z24 तास ,एन.डी.टी.व्ही. इंडीया,Tv9मराठी, यासारख्या नावाजलेल्या वृत्तवाहीन्यासुद्धा सुमितच्या या सामाजिक उपक्रमांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवीत आहेत. सुमीतच्या या सेवाभावी वृत्तीत माणूसकी दडलेली आहे. दीन दुबळ्यांचे उणे दुणे न काढता त्यांच्या मदतीला धावून येण्याच्या त्याच्या या मानवतावादी वृत्तीला माझे त्रिवार वंदन..!
सुमित पंडीत यांचा Z24 तास सुखवार्ता या सदरातील व्हिडीओ अजीत दादांनी फेसबुक वर टाकला आणि त्याची दखल घेत आज औरंगाबाद येथे सर्वाना बोलावून घेतले . माणुसकी रुग्ण सेवा गृप ला कौतुकाची थाप देत सर्वांसोबत जवळपास तासभर हितगुज केले. आई-वडिलांना न सांभाळणा-या मुलांसाठी शासनाने नव्याने कडक कायदा आणावा व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी असे प्रतिपादन दादांनी केले.विविध सामाजिक ऊदाहरणे देत दादांनी माणुसकी समुहाला मदत देखील करण्याचे जाहीर केले. अजीतदादा कडक स्वभावाचे आहे , असा गैरसमज होता परंतु वास्तविक आजच्या भेटीतून त्याचा स्वभाव खुप प्रेमळ व मनमिळाऊ आणि सलगी करणारा आहे. अक्षरशः सुमित पंडीत यांची कन्या लक्ष्मी व राम यांच्यासोबतही दादांनी हितगुज केले. दादांचा मुळ स्वभाव बघुन सुमित यांनी माणुसकी गृप तर्फे आभार मानले.
ह्या अचानक ठरलेल्या सदिच्छा भेटेत उपस्थित प्रदीप चव्हाण, रोहित देशमुख , माणुसकी गृप सदस्य कल्पेश पंडित,लक्षण बोर्डे,ज्ञानेश्वर पंडित,राम पंडित, संगीता गव्हाणे,पुजा पंडित, लक्ष्मी पंडित,आदी उपस्थित होते.
Post a Comment