बेलापूर (प्रतिनिधी )-
तीन वर्षात वेगवेगळ्या अधिकार्या मार्फत चौकशी करुन देखील हाती काहीच न लागल्यामुळे सदस्याने आधिकार्यावर दबाव टाकुन खोटी कारवाई करण्यास भाग पाडले आहे या कारवाईस ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या अवर सचिव निला रानडे यांनी तात्काळ स्थगिती दिली असल्याची माहीती माजी सरपंच भरत साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली विभागीय आयुक्त नाशिक यांनी भरत साळुंके यांना कर्तव्यात कसुर केला म्हणून ग्रामपंचायत अधिनियम१९५८चे कलम ३९ (१)नुसार सरपंच व सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरविले होते त्या कारवाईस साळुंके यांनी मंत्रालयात दाद मागीतली त्याची सुनावणी होवुन अंतिम आदेश पारित होईपर्यत स्थगिती दिली आहे आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला पोषक होईल असे कोणतेही काम आपण केलेले नाही माझ्यावर भूजल अधिनियमाचे उंल्लघन पिण्याचे दुषित पाणी मागास वर्गीयासाठी निधी न वापरणे असे आरोप आगोदर करण्यात आले होते नंतर अधिकार्यावर ज्या जबाबदार्या होत्या त्या माझ्यावर लादुन दडपणाखाली कारवाई करण्यात आलेली आहे वास्तविक ग्रामसभेचा संदिग्ध ठराव करणे निविदावर स्वाक्षरी न घेणे ई- निविदा टाळण्यासाठी कामाचे तुकडे करणे कामाची अनामत रक्कम रोख स्विकारणे कामगार विमा न भरणे गाळ्याचे वाटप नियमानुसार न करणे जाहिरात नोटीस बोर्डावर न लावणे ही कामे अधिकार्याशी संबधीत आहे त्यामुळे दोष आढळले तर आगोदर आधिकार्यावर कारवाई होणे अपेक्षित होते परंतु तसे न करता मलाच दोषी धरले या सर्व प्रकारास अधिकारी जबाबदार असताना केवळ राजकीय हेतुने माझ्यावर कारवाई करण्यास भाग पाडले या कामासंदर्भात आधिकार्याचे मार्गदर्शन परवानगी लेखा विभागाकडुन तपासणी करुनच कामे करुन घेतली असतानाही फक्त राजकीय द्वेष समोर ठेवुन जिल्हा परीषद सदस्याने आपली ताकद पणाला लावुन कारवाई करण्यास भाग पाडले आता भविष्यात जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत माझी किंवा माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा कुणी प्रयत्न केला तर रोख ठोक उत्तर देवु आपण सर्व कामे नियमानुसार केलेली आहेत सरपंच पदावर असताना प्रामाणिकपणे काम केले असतानाही माझी व संघटनेची बदनामी केली असुन सत्य लवकरच जनते समोर येणारच आहे असेही साळुंके म्हणाले या वेळी उपसरपंच रविंद्र खटोड सेवा सोसायटीचे चेअरमन विलास मेहेत्रे रामनाथ शिंदे किशोर बोरुडे अय्याजअली सय्यद विवेक वाबळे जावेद शेख ज्ञानेश्वर कुलथे अभिजित राका दिवाकर कोळसे विजय शेलार रफीक शेख आदि उपस्थित होते
Post a Comment