आजिंठा-दि.22-08:-जगप्रसिद्ध अजिंठा लेणी च्या सप्तकुंड धबधब्याजवळ सेल्फी घेतांना मुंबई बांद्रा येथील रहिवासी पर्यटक अशोक भाऊसाहेब हुलकांडे याचा तोल जाऊन तो 150-200 फूट खोल कुंडात जाऊन पडला.दैव बलवत्तर तो पाण्याच्या तीव्र प्रवाहाने पाण्यात न बुडता पाण्यावर फेकला गेला,त्याने लागलीच खडकाचा आसरा घेऊन तब्बल दोन तास कुंडात काढले.शेवटी भारतीय पुरातत्व विभाग व लेनापूरच्या स्थानिक रहिवाश्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने त्यास कुंडातून काढून त्याचे प्राण वाचवले.कोणत्याही पर्यटन स्थळी जीवावर बेतेल अशी सेल्फी घेऊ नका...!
अजिंठा लेणीच्या बाजूला असलेल्या लेनापुर च्या डोंगरातील सप्तकुंडात एक पर्यटक गुरुवारी दुपारी पाय घसरून पडला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी त्यास सुखरूप कुंडातून बाहेर काढले यामुळे अनर्थं टळला..
अशोक भाऊसाहेब हुकांडे रा. बांद्रा मुंबई असे या पर्यटकाचे नाव आहे. सदर पर्यटक लेणापूर डोंगरातील निसर्ग सोंदर्य बघण्यासाठी लेणीच्या माथ्यावर चढला व येथील सप्तकुंड धबधब्या जवळ गेला. तेथे पाण्यात त्याने मन सोकत भिजून आनंद घेतला. पण पाण्यात शेवाळ असल्याने कळत न कळत तो कधी खाली ३०० फूट खोल असलेल्या सप्त कुंडात पडला त्याला कळाले नाही.
त्याने आरडा ओरड केल्याने आस पास असलेल्या लोकांनी ही माहिती पुरातत्व अधिकारी डी .एस. दानवे याना दिली त्यांनी लगेच दोरी व बचाव कार्य साठी लागणारे साहित्य मागवून नागरिक व पुरातत्व कर्मचारी यांच्या स हा याने त्याला कसरत करून बाहेर काढले.
त्या पर्यटकाला पोहता येत असल्याने तो एक कपारी च्य सहायाने तब्बल अडीच तास पाण्यात होता त्या मुळे त्याला थरकाप सुटला होता.शिवाय खोल कुंडात असल्याने त्याला दोरीला लटकवून वर ओढण्यात आले यामुळे तो प्रचंड घाबरला होता. पण पाणी व कुंड खोल असल्याने दुस रा पर्याय नसल्याने त्याला शर्थी चे प्रयत्न करून वाचवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आली. त्याला बाहेर काढल्यावर फर्दापूर व नंतर अजिंठा येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. आता त्याची प्रकुर्ती चांगली असल्याची माहिती दानवे यांनी दिली

Post a Comment