बुलडाणा- 23 ऑगस्ट
ए टी एम मधुन पैशे ट्रान्सफर कसे करता? अशी विचारणा करत दोन अनोळखी इसमानी पिंपळखुटा खु. येथील रहिवाशी व शनिमंदिर टाकरखेड येथील सुपरवायजर विनोद प्रकाश भामद्रे वय 30 ह्याला 30 हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना आज शुक्रवार 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12:45 वाजेच्या दरम्यान घडली असून बोराखेडी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
या बाबत सविस्तरपणे वृत्त असे की नांदुरा तालुक्यातील पिंपळखुटा खु. येथील रहिवाशी व गेल्या 10 वर्षा पासुन शनिमंदिर टाकरखेड येथे सुपरवायजर म्हणून कार्यरत असलेले विनोद प्रकाश भामद्रे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की गेल्या 10 वर्षा पासून शनिमंदिर टाकरखेड येथे सुपरवायजर चे काम करत असुन मंदिराचे व मंदिराच्या शेतीच्या संपुर्ण पैशाचे व्यवहार तेच बघतात. दरम्यान आज 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंदिराच्या प्रसादाचे समान व मंदिराच्या ताब्यात असलेल्या शेती पिकावर किटनाश फवारणीचे औषध घेण्याकरिता मंदिराचे अध्यक्ष रमेश जगन्नाथ वराडे यांच्या कडून 10 हजार रु घेतले तसेच त्यांचे मामा महादेव धोडूजी खिरोडकर यांनीही त्यांच्या मुलाच्या महाराष्ट बँकेच्या एटीएम मधून 20 हजार रु काढून आणायांचे सांगितले होते.सदर रक्कम काढण्यासाठी अंदाजे 12:45 दरम्यान स्टेस्ट बँकच्या मोताळा येथील एटीएम मधून 20 हजार रु. काढले तेव्हा तिथे हजर असलेले 2 अनोळखी इसमानी अंदाजे वय 22 ते 25 तर दुसरा 25 ते 30 वर्षे यांनी फिर्यादिस म्हणाले की मला पैशे ट्रान्सफर करायचे आहे असे म्हणाले तेव्हां माझ्या हातातील एकूण 30 हजार माझ्या जवळील प्लास्टिक च्या पिशवीत होते त्या दोन अनोळखी इसमा पैकी एकाने त्याच्या कडील कापडी पिवळ्या रंगाची पिशवी हात चालाकीने फिर्यादिच्या हातात दिली तर त्याच्या हातात असलेली प्लास्टिकची पैशाची पिशवी हातचालखीने स्वत:च्या हातात घेऊन तेथून निघुन घेला अशी फिर्याद विनोद प्रकाश भामद्रे यांनी बोराखेडी पोलिसांना दिली.
विनोद प्रकाश भामद्रे यांच्या फिर्यादी वरून बोराखेडी पोलिसांनी दोन अनोळखी आरोपी विरुद्ध अप क्रमांक 270/19 भादवी ची कलम 420,34 नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय गजानन वाघ हे करीत आहे.सदर घटनेचे सीसीटीवी फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
Post a Comment