घरकुलाच्या चौकशीचे आदेश दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांची पत्रकबाजी -साळवी ,अमोलीक
बेलापूर-( प्रतिनिधी)-गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुलात सुरु असलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे पित्त खवळलेल्या सत्ताधाऱ्यांनी पत्रकबाजी सुरु केली असुन ही पत्रकबाजी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी सरपंच महेंद्र साळवी व सदस्य रमेश अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .साळवी व अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की घरकुलाच्या चौकशी करीता गटविकास अधिकारी म्हस्के यांनी उपोषण सोडविताना ज्या बारा मागण्या केल्या होत्या त्यात सत्यता असल्यामुळे चौकशी समीतीची नियुक्ती करुन सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या चौकशी समीतीमुळे आपली लबाडी उघड होण्याच्या भितीमुळे सत्ताधारी गडबडले आहेत ही बाब नागरिकांच्या लक्षात येणार असल्याने चुकीच्या पद्धतीच्या कामावरील लक्ष विचलित करण्यासाठी गावातील काहींना हाताशी धरून गटविकास अधिकारी मस्के साहेब यांना निवेदन देऊन चौकशीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे तसेच माजी सरपंच भरत साळुंके व सभापती सुधीर नवले यांच्या खाजगी बांधकामाची चौकशीचे आदेश घेण्यात आले .मुळात बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम कायदेशीर कि बेकायदेशीर हे पाहण्याचा अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला आहे यांच्या बांधकामाची चौकशी सरपंच व ग्रामसेवक यानी करणे गरजेचे असताना चौकशीचा फार्स कशासाठी आम्ही मांडलेल्या मुद्द्यापैकी घरकुलाच्या बाबत सरपंचांना गावातील गावकरी मडळाचे पुढारी व ठेकेदार चुकीची माहिती दिलेली दिसते कारण माननीय ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शासनाकडून बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला जी जमीन देण्यात आली त्यामध्ये काही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य अट हि बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत च्या नावे जमीन झाल्यानंतर सदरच्या जमिनीचा लेआउट तयार करून नगरचना विभाग श्रीरामपूर यांचे कडून रेखांकन मंजूर करून सदरील भूमिहीन लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने पाचशे स्क्वेअर फुट जागा वाटप करण्यात यावी असे असताना ग्रामसभेत दोन तास चर्चा करून ज्या लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीत भाग घ्यायचा आहे त्यांच्या सोबत काढुनी 500फुट जागा त्यांच्या ताब्यात द्यावी असे ठरलेले असताना खाजगी ठेकेदाराकडे एक लाख 35 हजार रुपये रोख स्वरूपात जमा करणारे हे कोण असा सवाल साळवी व अमोलीक यांनी केला असून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गरीबांच्या घरकुलासाठी जमीन देवुन ही सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे लाभार्थी घरकुलापासुन वंचित राहु शकतात. रेखांकन मंजूर न करता घरकुल बांधण्याची घाई का केली जात आहे तसेच सुमारे 400 लाभार्थींची ओटीपी नंबर घेऊन वाळू कोणाच्या बांधकामावर गेली किंवा त्याची विक्री करण्यात आली याची चौकशी होणे गरजेचे आहे तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवेदन दिलेले होते. त्या नीवेदनातील सर्व बाबी समजून सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची सत्यता जाणून घेतली व ती केलेली मागणी योग्य असल्यामुळे तालुक्यामध्ये कुठल्याही गावांमध्ये चुकीच्या पद्धतीने काम होऊन देणार नाही मागील एक वर्षांमध्ये मा आमदार हेमंत ओगले यांनी बेलापूर ग्रामपंचायत परिसरात एक कोटी दहा लाख रुपयांची कामे मंजूर केली असून यावर्षी एक कोटीचे विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहेत.असे असताना जर कुणी आंदोलन करण्याची धमकी देत असेल तर प्रति आंदोलन करण्याची आमची तयारी आहे मागील चार दिवसांपूर्वी मा गटविकास अधिकारी श्रीरामपूर पंचायत समिती यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच यांच्या पत्रावरून लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी केली होती ती जर बरोबर असेल तर गटविकास अधिकारी श्रीरामपूर यांनी जोपर्यंत रेखांकन मंजूर होऊन जागावाटप होत नाही व जिओ टॅगिंग संबंधित लाभार्थींच्या व ग्राम विकास अधिकारी यांच्या फोटोसह मला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत दुसरा हप्ता देणार नाही अशा आशयाचे पत्र बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला देण्यात आलेले आहे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये मागील पाच वर्षांमध्ये कोणत्या नेत्याचे चिरंजीव काम करतात हे नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांना इतर गावातील कामांच्या नावाने ब्लॅकमेलिंग करून बिले काढण्याचा धडाका संबंधित गावपुढ्यार्यानी केलेला आहे सरपंच सौ साळवी यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील झालेल्या कामांची पाहणी करून चौकशी करावी आपला बोलवता धनी कोण आहे हे सर्व जनतेला माहित आहे व सर्व जनतेला झेंडा चौकात वरील सर्व कागदपत्र घेऊन मी दाखवायला तयार आहे त्यामुळे बेलापूर येथील नागरिकांनी या गाव पुढ्याया पासुन सावध राहावे असे आव्हान माजी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केले आहे








