Latest Post

बेबेलापूर (प्रतिनिधी)- कसलीही माहिती उपलब्ध नसताना मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेवुन बेलापूर पोलीसांनी त्या व्यक्तीस नातेवाईकांच्या ताब्यात दिले मनोरुग्ण मुलाला पहाताच आई व भावाला गहीवरुन आले . पोलीसातील माणूस आजही जिवंत असल्याची भावना आई अलका ससाणे यांनी व्यक्त केली.                             वाहेगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथील सोमनाथ नंदकुमार ससाणे हा मनोरुग्ण आहे .त्या अवस्थेत त्याने घर सोडले व भटकत भटकत तो उक्कलगाव येथे पोहोचला. येथील शिंदे वस्तीत गेल्यावर त्याने आरडाओरड सुरु केली अशोक शिंदे ,शुभम शिंदे,वैभव शिंदे, प्रमोद शिंदे यांनी तातडीने युवा नेतृत्व युवराज थोरात यांना माहिती दिली. युवराज थोरात पोलीस पाटील हिराबाई मोरे , इंद्रजित मुसमाडे ,मुकेश जगधने, दिपक पवार ,सोन्या खेमनर यांच्या सह शिंदे वस्तीवर पोहोचले त्यांना वाटले चोर असावा परंतु तो निरर्थक बडबड करीत होता. तो काहीही बोलू लागला. कुणाच्याही घरात जावु लागला रस्त्यावर बसुन लोळू लागला .युवराज थोरात व पोलीस पाटील हिराबाई मोरे यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संपत बडे यांना या बाबत माहिती दिली संपत बडे तातडीने तेथे आले त्यावेळेस योगेश ससाने याच्या खिशात काहीही आढळून आले नाही. त्याला माहिती विचारली असता तो केवळ ससाने इतकेच सांगत होता त्यामुळे काय करावे हा प्रश्न बडे यांना पडला त्यांनी त्याला खोदून खोदून विचारले परंतु त्याला काही नाव गाव पत्ता काहीच सांगता येत नव्हते व तो वेगळीच काहीतरी बडबड करीत होता. बडे यांनी गृहरक्षक दलाचे महेश थोरात, रणजीत थोरात,  व हर्षल इंगळे यांच्या सहकार्याने त्यास बेलापूर पोलीस स्टेशन येथे आणले. तेथे त्याला नाश्ता दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एक वार तपासणी केली असता त्याच्या खिशात एक बारीक कागद सापडला त्यावर कुणाचा तरी नंबर होता पोलीस कॉन्स्टेबल बडे यांनी त्या नंबर वर संपर्क साधला असता त्यांनी देखील मी संबंधितास  ओळखत नाही माझ्या परिचयाचा नाही असे सांगितले परंतु बडे यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता त्याने त्या गावातील एका व्यक्तीचा नंबर दिला. बडे यांनी संबंधित व्यक्तीच्या फोनवर फोन केला असता त्याने सदर इसम आमच्या गावातीलच असून तो मनोरुग्ण असल्याचे सांगितले व त्याच्या भावाचा व आईचा नंबर दिला पोलिसांनी तातडीने त्याचा भाऊ योगेश याचेशी संपर्क साधला भाऊ मिळाल्याचे समजताच दोघांनाही अतिशय आनंद झाला ते तातडीने बेलापूर येथे येण्यास रवांना झाले तोपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती देखील आईने पोलिसांना केली  पहाटे दोन वाजता त्याची आई अलका नंदकुमार ससाने व  भाऊ योगेश बेलापूर पोलीस स्टेशनला आले व भावाला ताब्यात घेतले त्यावेळी आईचा व भावाचा आनंद गगनात मावेना त्यांनी मुलाला शोधून दिल्याबद्दल पोलिसांना धन्यवाद दिले. पोलीस आपले कर्तव्य चूक बजावत असून आपल्या मनोरुग्ण मुलाला सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात दिल्याबद्दल आई अलका नंदकुमार ससाने हिने बेलापूर पोलिसांना धन्यवाद दिले ससाने कुटुंबीयाचे आनंदाश्रू पाहून पोलीस कॉन्स्टेबल बडे व होमगार्ड रणजीत थोरात महेश थोरात हर्षल इंगळे यांनाही गहिवरून आले

श्रीरामपूर (प्रतिनिधी):सेवा हीच खरी इबादत या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गुरुवर्य, वडीलधारी ‘मोठे बाबा’ आणि स्वर्गीय जुबेर भाई बिनसाद बाबा यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ‘दवा आणि दुवा’ ही समाजसेवेची चळवळ आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे. दोन्ही मार्गदर्शक आज हयात नसतानाही, त्यांच्या विचारांचा आणि सेवावृत्तीचा वारसा जपत हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आजही गोरगरिबांच्या आरोग्यासाठी भक्कमपणे उभी आहे.

याच परंपरेचा भाग म्हणून श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्था आणि राहता येथील डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी संस्थेच्या सेवाभावी परंपरेचे विशेष कौतुक करत, “अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी जिवंत राहते,” अशी भावना व्यक्त केली.


गोरगरिबांसाठी आरोग्यसेवेचा आधार

या शिबिरामागील प्रमुख उद्देश म्हणजे गरिब, वंचित आणि उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांपर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचवणे हा आहे. याच भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून, दरवर्षी ही सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात येते, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

तज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार

या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, कर्करोग, त्वचारोग, मूत्ररोग, किडनी, मेंदू, मणक्याचे विकार, कान-नाक-घसा (ENT), दंतशस्त्रक्रिया व मधुमेह अशा विविध आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.


डॉ. रहमत दारूवाले आणि डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय टीमने सेवाभावाने या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. अनेक रुग्णांच्या चेहऱ्यावर उपचारानंतर समाधान आणि आशेचे भाव दिसून आले.

सेवेची परंपरा पुढे नेणारे हात

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत होते. स्वर्गीय मार्गदर्शकांनी दिलेला सेवा, समर्पण आणि माणुसकीचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यामागे स्पष्टपणे जाणवत होता.

‘दवा आणि दुवा’ म्हणजे केवळ उपचार नाही, तर आधार

आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उपचार खर्च परवडत नाही, तिथे हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरत आहे.

या स्तुत्य कार्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान आणि आशीर्वाद व्यक्त होत असून, “ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

बेलापूर-( प्रतिनिधी)-गटविकास अधिकाऱ्यांनी घरकुलात सुरु असलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे पित्त खवळलेल्या सत्ताधाऱ्यांनी पत्रकबाजी सुरु केली असुन ही पत्रकबाजी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे माजी सरपंच महेंद्र साळवी व सदस्य रमेश अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .साळवी व अमोलीक यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की घरकुलाच्या चौकशी करीता गटविकास अधिकारी म्हस्के यांनी उपोषण सोडविताना ज्या बारा  मागण्या केल्या होत्या त्यात सत्यता असल्यामुळे चौकशी समीतीची नियुक्ती करुन सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत या चौकशी समीतीमुळे आपली लबाडी उघड होण्याच्या भितीमुळे सत्ताधारी गडबडले आहेत ही बाब नागरिकांच्या लक्षात येणार असल्याने चुकीच्या पद्धतीच्या कामावरील लक्ष विचलित करण्यासाठी गावातील काहींना  हाताशी धरून गटविकास अधिकारी मस्के साहेब यांना निवेदन देऊन चौकशीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे तसेच माजी सरपंच भरत साळुंके व सभापती सुधीर नवले यांच्या खाजगी बांधकामाची चौकशीचे आदेश घेण्यात आले .मुळात बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये बांधकाम कायदेशीर  कि बेकायदेशीर हे पाहण्याचा अधिकार ग्रामपंचायत प्रशासनाला आहे  यांच्या बांधकामाची चौकशी सरपंच व ग्रामसेवक यानी करणे गरजेचे असताना चौकशीचा फार्स कशासाठी आम्ही मांडलेल्या मुद्द्यापैकी घरकुलाच्या बाबत सरपंचांना गावातील गावकरी मडळाचे पुढारी व ठेकेदार चुकीची माहिती दिलेली दिसते कारण माननीय ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी शासनाकडून बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला जी जमीन देण्यात आली त्यामध्ये काही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये मुख्य अट हि बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत च्या नावे जमीन झाल्यानंतर सदरच्या जमिनीचा लेआउट तयार करून नगरचना विभाग श्रीरामपूर यांचे कडून रेखांकन मंजूर करून सदरील भूमिहीन लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने पाचशे स्क्वेअर फुट जागा वाटप करण्यात यावी असे असताना ग्रामसभेत दोन तास चर्चा करून ज्या लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीत भाग घ्यायचा आहे त्यांच्या सोबत काढुनी 500फुट जागा त्यांच्या ताब्यात द्यावी असे ठरलेले असताना खाजगी ठेकेदाराकडे एक लाख 35 हजार रुपये रोख स्वरूपात जमा करणारे हे कोण असा सवाल साळवी व अमोलीक यांनी केला असून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी गरीबांच्या घरकुलासाठी जमीन देवुन ही सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे लाभार्थी घरकुलापासुन वंचित राहु शकतात.  रेखांकन मंजूर न करता घरकुल बांधण्याची घाई का केली जात आहे तसेच सुमारे 400 लाभार्थींची ओटीपी नंबर घेऊन वाळू कोणाच्या बांधकामावर गेली किंवा त्याची विक्री करण्यात आली याची चौकशी होणे गरजेचे आहे तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवेदन दिलेले होते. त्या नीवेदनातील सर्व बाबी समजून सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याची सत्यता जाणून घेतली व ती केलेली मागणी योग्य असल्यामुळे  तालुक्यामध्ये कुठल्याही गावांमध्ये चुकीच्या पद्धतीने काम होऊन देणार नाही मागील एक वर्षांमध्ये मा आमदार हेमंत ओगले यांनी बेलापूर ग्रामपंचायत परिसरात एक कोटी दहा लाख रुपयांची कामे मंजूर केली असून यावर्षी एक कोटीचे विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलेले आहेत.असे असताना जर कुणी आंदोलन करण्याची धमकी देत असेल तर प्रति आंदोलन करण्याची आमची तयारी आहे मागील चार दिवसांपूर्वी मा गटविकास अधिकारी श्रीरामपूर पंचायत समिती यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच यांच्या पत्रावरून लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात यावा अशी मागणी केली होती ती जर बरोबर असेल तर गटविकास अधिकारी श्रीरामपूर यांनी जोपर्यंत रेखांकन मंजूर होऊन जागावाटप होत नाही व जिओ टॅगिंग संबंधित लाभार्थींच्या व ग्राम विकास अधिकारी यांच्या फोटोसह मला उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत दुसरा हप्ता देणार नाही अशा आशयाचे पत्र बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतला देण्यात आलेले आहे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये मागील पाच वर्षांमध्ये कोणत्या नेत्याचे चिरंजीव काम करतात हे नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज नाही कामाच्या गुणवत्तेबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांना इतर गावातील कामांच्या नावाने ब्लॅकमेलिंग करून बिले काढण्याचा धडाका संबंधित गावपुढ्यार्यानी केलेला आहे सरपंच सौ साळवी यांनी बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील झालेल्या कामांची पाहणी करून चौकशी करावी आपला बोलवता धनी कोण आहे हे सर्व जनतेला माहित आहे व सर्व जनतेला झेंडा चौकात वरील सर्व कागदपत्र घेऊन मी दाखवायला तयार आहे त्यामुळे बेलापूर येथील नागरिकांनी या गाव पुढ्याया पासुन  सावध राहावे असे आव्हान माजी सरपंच महेंद्र साळवी व ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी केले आहे

बेलापूरःबेलापूरची घरकुल योजना पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचे संकल्पनेनुसार सुरु आहे.सदर योजनेबाबात आमदारांना बिल्डर लाॕबीकडून चुकीची माहिती दिली जात असल्याने आमदार अधिकाऱ्यांवर दबाव आणून आडकाठी आणित आहेत.वास्तविक सदर योजनेच्या स्वरुपास व योजनेस आमदारांनी आमसभेमध्ये संमती दिली.आता तेच  गोरगरीबांच्या सदर योजनेस सहकार्य करणेऐवजी ह्या योजनेत बाधा आणित आहेत.यामुळे गोरगरीब बेघरांना योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.त्यामुळे आमदारांनी चुकीची माहिती देणा-यांच्या सांगण्यावरुन घरकुलाचे कामात बाधा आणल्यास घरकुल योजनेच्या  लाभार्थ्यांचा आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सरपंच  मिनाताई साळवी यांनी दिला आहे.               सौ.साळवी म्हणाल्या की,बेलापूरची घरकुल योजना हि राज्यात आदर्श ठरावी यासाठी नाम.विखे पा. व नाम.गोरे यांनी काही मार्गदर्शक सुचना केल्या.सदर योजनेबाबत आमदारांनी आयोजित केलेल्या आमसभेत सविस्तर चर्चा देखिल झाली.यावेळी योजनेचे सविस्तर स्वरुप व तपशील सविस्तरपणे मांडण्यात आला.तेव्हा आमदारांनी त्यास संमती दिली. माञ या योजनेमुळे बिल्डर लाॕबीच्या हितसंबंधास  बाधा येणार असल्याने  सुधीर नवले,भरत साळुंके ,रविन्द्र खटोड आदि नेत्यांनी काही जणांना चिथावणी देवून मोर्चे,उपोषणे करायला लावले.तसेच या कानभ-या नेत्यांनी आमदारांना चुकीची माहिती देवून अधिका-यांवर दबाव आणणे भाग पाडले.अशाच त-हेने या महाभागांनी महिलांच्या सार्वजनिक शौचालयाला विरोध करुन ते काम बंद पाडले.एकीकडे हे महाभाग स्वतःला नाम.विखे पा.यांचे सरर्थक म्हणवतात तर दुसरीकडे नाम.विखे पा.यांच्या संकल्पनेतील घरकुल योजनेस विरोध करण्याचा  दुटप्पीपणा करतात असा आरोप सौ.साळवी यांनी केला.                                                             घरकुल योजनेचे काम चुकीच्या पध्दतीने होत असल्याचा आरोप तथ्यहिन असून हि निवडणुका जवळ आल्याने होणारी राजकीय स्टंटबाजी आहे.आरोप करणारांनी तक्रारीत नमुद केल्यानुसार  घरकुल योजना राबवायची तर उपलब्ध जागेत फक्त ५३७ इतकीच घरकुले बसतील.यामुळे ५०० लाभार्थ्यांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागेल.या वंचित ५०० लाभार्थ्यांना घरकुले देण्याची जबाबदारी आमदार व तक्रार करणारे घ्यावयास तयार आहेत काय आसा सवाल सौ.साळवींनी उपस्थित केला.                    अशी वस्तुस्थिती असल्याने आमदारांनी या योजनेच्या कामाची समक्ष  पाहणी करुन योजनेची सविस्तर माहिती घ्यावी. चुकीच्या माहितीला बळी पडून स्वतःची अडचण करुन घेवू नये.अशाचत-हेने काहिजणांच्या चुकीच्या माहितीवरुन आमदारांनी टिळकनगर इंडस्ट्रिजबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने त्यांना कामगारांसह नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले होते.तसेच नंतर दिलगीरी व्यक्त करावी लागली होती याची आठवण ठेवून आमदारांनी चुकीच्या माहितीच्या आधाराने घरकुल योजनेत बाधा आणून गोरगरीब लाभार्थींचा रोष पत्करु नये.अशाच पध्दतीने दत्तनगर येथे रो हऊसिंग पध्दतीचे काम केले जात आहे.तोच पॕटर्न नाम.विखे पा.यांचे सुचनेवरुन स्विकारुन घरकुलांचे काम सुरु आहे.तेव्हा आमदारांनी बिल्डर लाॕबीच्या दिशाभुलीला बळी पडून गोरगरीबांना उघड्यावर पाडू नये असे.उलट या योजनेस मार्गदर्शन  व सहकार्य करावे.तसेच ग्रामस्थांनी आमदारांना मते दिली असल्याने गावातील अरुणकुमार वैद्यपथ,मेनरोड-केशव गोविंद मंदिर रस्ता,कु-हे वस्ती, जामा मशिद - गणपती  मंदिर-ते महादेव मंदिर रस्ता आदि रस्त्यांचे कामांना आमदारनिधी द्यावा असे आवाहन सौ.साळवी यांनी केले आहे.

बेलापूर (प्रतिनिधी):येथील छ.शिवाजी महाराज चौकात   भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त  ह.भ.प. मोहन खानविलकर महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजन तर बेलापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष भास्कर खंडागळे  यांचे हस्ते सृष्टीचे शिल्पकार मानल्या जाणाऱ्या विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमेचेवस पुष्पहार अर्पण करण्यात आले.               

     प्रतिमा पूजनानंतर  उपस्थितांनी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी भरत साळुंके ,अभिषेक खंडागळे ,रविन्द्र खटोड, प्रकाश कुऱ्हे, पञकार नवनाथ कुताळ,सुहास शेलार,दिलिप दायमा, बाळू शेठ खातीजी, चंद्रकांत पाटील नाईक,  रमेश अमोलिक, श्रीराम शर्मा, संजय शर्मा, सुरज शर्मा, प्रशांत लढा, राधेश शर्मा, राजेंद्र पोपळघट, जालिंदर शिंदे, गोविंद गाडेकर, शफिक आतार, नितीन शर्मा, दत्तात्रय कुऱ्हे, सोमनाथ शिरसाठ, महादेव गाडेकर, ऋषी वाकचौरे, रामभाऊ वाकचौरे, गोविंद भराटे आणि सुनील कुऱ्हे आदिंसह  ग्रामस्थ व कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलापूर ( प्रतिनिधी)-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर बु!! मराठी शाळा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .शाळेतील सर्व मुली व मुले यांचे  कवायत व लेझीम घेण्यात आली उद्देशकांचे वाचन व असाक्षरता प्रतिज्ञा घेण्यात आली. ध्वजारोहण पोलीस पाटील अशोक प्रधान व  बोरुडे सर यांच्या हस्ते करण्यात आले विविध गुणदर्शन स्पर्धेत सहभागी असणाऱ्या मुला-मुलींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले, या वेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोगत, देशभक्तीपर गीत गायन सादर  केले, बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने मुलांना रेवडी ( खाऊ) वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे व राजाभाऊ काळे, मोकाशी दादा, श्रीमती निमसे ताई यांच्या वतीने देखील खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी. जि. प. सदस्य श्री शरद  नवले पाटील , व माजी उपसरपंच व  ग्रामपंचायत सदस्य  श्री. अभिषेक खंडागळे पाटील, श्री. अरुण पाटील नाईक, सरपंच श्रीमती मीनाताई साळवी, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.तुफेल अहमद सय्यद,शाळा व्यवस्थापन समिती मुली अध्यक्ष निमसे ताई व माजी विद्यार्थी संघ मेळावा अध्यक्ष श्री. शाहरुख भाई शेख, उपाअध्यक्ष, राज गुडे, कृष्ण भागवत  अंगणवाडी सेविका शेलार ताई, तेलोरे ताई, बेलापूर मुले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उदमले मॅडम, उपमुख्यधापिका सौ. अंत्रे मॅडम, शिंदे मॅडम, देवढे मॅडम बेलापूर मुली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दहिवाळ मॅडम उपमुख्याध्यापिका सौ. भवार मॅडम, श्रीमती. परदेशी मॅडम दोन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

बेलापूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर तालुक्यातील 11 गावामध्ये स्री पुरुष जन्मदरा मध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे. मुलीचा जन्मदर घटण्यामागील कारणांचा शोध घेवून कोणी जर काही गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला बेलापूर खुर्द ग्रामपंचायत च्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध योजना व मुलीचा जन्मदर वाढण्याबाबत उपाय व मार्गदर्शन या विषयावर आयोजित केलेल्या चर्चा सत्रात अध्यक्षपदावरून ते बोलत होते यावेळी उपविभागीय अधिकारी किरण सावंत ,उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ,गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, महिला बाल विकास अधिकारी शोभाताई शिंदे सरपंच सविता राजुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले की बेलापूर खुर्द या गावात मुलींचा

जन्मदर अतिशय कमी असून या मागील उपाय शोधणे आवश्यक आहे गावात व परिसरात कोणी गैरप्रकारे गर्भलिंग निदान चाचणी करत असेल तर त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे कृत्य कुणी महिला दलाल हे करत असतील तर त्याची माहिती पोलीस खात्याला किंवा महसूल विभागाला द्या आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल उपस्थित पालकांना देखील विनंती आहे की मुलगा व मुलगी यामध्ये फरक करू नका मुलगी घराची लक्ष्मी आहे. तिच्या जन्माचे स्वागत करा आज मुलींची संख्या कमी असल्यामुळे अनेक मुले विवाह पासून वंचित आहेत यात महिलांची ही जबाबदारी तितकीच महत्त्वाची आहे. हा विषय आरोग्य विभागाचा असला तरी सामाजिक  व कायदेशीर भान आपल्याला ठेवावे लागणार आहे ग्रामपंचायत स्तरावर देखील मुलींच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे असे उपक्रम सर्व ठिकाणी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी किरण पाटील सावंत म्हणाले की एक महिला जी घर व्यवस्थित चालू शकते तालुक्याचे जिल्ह्याचे व देशाचे नेतृत्व करू शकते त्यामुळे महिलेला कमजोर समजू नका. स्री व पुरुष यांना समान वागणूक द्या मनातील नकारात्मक भावना काढून टाका आज सर्व स्तरावर मुली जोमाने काम करताना दिसत आहे त्यामुळे मुलींचा जन्मदर कसा वाढेल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे शासनाचे देखील या बाबीकडे लक्ष असणार आहे. कुणी चुकीचं काही करत असेल तर त्याला नक्कीच शासन केले जाईल असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना महिला बालविकास अधिकारी शोभा शिंदे म्हणाल्या  की मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागणार आहे त्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी करू नका. मुलीला गर्भातच मारू नका. त्याकरता शासनाने लेक लाडकी योजना राबविली आहे ग्रामपंचायत  व सामाजिक स्तरावर मुलीच्या जन्माचे स्वागत करून समाज जागृती होणे आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या यावेळी गट विकास अधिकारी सुभाष म्हस्के, वरिष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.या वेळी द्वारकनाथ बडवे कैलास वाकडे गोरखनाथ बडधे, सुरेश महाडिक, सोमनाथ वाकडे, गोरख भगत, ग्रामसेवक राजेंद्र मेहत्रे विलास भालेराव, प्रशांत शहाणे, समीर सय्यद, रामदास बडधे, बाबुराव फुंदे ,सौ स्वाती घोरपडे, मानसी थोरात, उषा गुलदगड ,मनीषा थोरात , प्रियंका थोरात कल्पना भगत ग्रामपंचायत ऑपरेटर वर्षा सगळगीळे, आरोग्य विभागाचे डॉक्टर ममता धीवर, आरोग्य सेवक गिरीश जाधव, विमलताई माने ,संगीता पुजारी, अंबिका भालेराव, कल्पना भगत, आदीसह अंगणवाडी सेविका शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणाली भगत यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र बारहाते यांनी केले शेवटी उपसरपंच एडवोकेट दिपक बारहाते यांनी आभार मानले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget