Latest Post

खंडाळा (गौरव डेंगळे) : खंडाळा येथील चित्तरंजन येथे गट नंबर ५३,५४,५५  शॉर्टसर्किटमुळे रविवार (दि.५ जानेवारी) लागलेल्या आगीत ८ ते १० एकर ऊस खाक झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.

खंडाळा येथे रविवारी दुपारी १:०० वाजेच्या सुमारास विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली. यामध्ये शेतकरी नवनाथ गंगाधर ढोकचौळे, रावसाहेब रंगनाथ ढोकचौळे, बबन किसन ढोकचौळे, सागर शंकर सदाफळ या शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस व ठिबक सिंचन जळून गेला.या सर्वांची शेती एकमेकाला लागून असून,या सर्वच ८ ते १० एकरामधील क्षेत्रावर उसाचे पीक होते. या ठिकाणी अचानक वीजवाहक तारांमध्ये घर्षण होत उसाला आग लागली. यावेळी प्रवारा कारखान्याचा अग्निशमन बंब बोलावला गेला होता. पण आटोक्यात काय आग आली नाही.गावातील १०० ते २०० युवकांनी देखील आज आग विजवायचा प्रयत्न केला. यावेळी कामगार तलाठी पवार भाऊसाहेब व त्यांचे सहकारी दिलीप रंधे यांनी घटनास्थळी येऊन जळीताचा पंचनामा केला.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): नुकत्याच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ५० वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये आझाद क्रीडा मंडळचा खेळाडू जयंत बाळासाहेब काळे याची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली आहे.

उत्तराखंड येथे होणार अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने उत्तराखंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने

५० वी कुमार-कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जयंत काळे महाराष्ट्र संघामध्ये आपल्या खेळाची चमक दाखवणार आहे.सांगली येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. गेली २ ते ३ वर्षापासून तो टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळ या ठिकाणी कबड्डीचा सराव करत आहे. जयंत हा वाकडी येथील प्रगतशील शेतकरी श्री हरिभाऊ विठ्ठल काळे यांचा नातू व बाळासाहेब हरिभाऊ काळे यांचा चिरंजीव आहे.कबड्डी खेळाचे तज्ञ प्रशिक्षक रवींद्र गाढे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.निवड झाल्याबद्दल त्याचे व्यवस्थापक अक्षय थोरात व सर्व आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू, क्रीडाप्रेमी व टाकळीभान येथील पदाधिकारी त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.

गौरव डेंगळे/दिल्ली ५/१/२०२५: सोमवार दि १३ जानेवारी २०२५ पासून भारताची राजधानी दिल्ली येथे पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे.यामध्ये एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला असून यजमान भारतासह अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्राझील, इंग्लड, जर्मनी, घाना, इंडोनेशिया, इराण, केनिया, मलेशिया, नेपाळ, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, श्रीलंका, युगांडा आणि अमेरिका एवढे देश सहभागी होत आहेत. 

भारताच्या ग्रामीण भागासह शहरी भागात देखील खो-खो खेळ प्रसिद्ध असून या खेळाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आता हा खेळ जागतिक पातळीवर खेळला जाणार असल्याने खो-खो प्रेमींसाठी ही एक पर्वणी असणार आहे. भारताचे पारडे या विश्वकरंडक स्पर्धेत जड वाटत असले तरी शेजारील आशियाई देशांकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. #TheWorldGoesKho हा हॅशटॅग या स्पर्धेसाठी वापरण्यात येत असून नुकतेच शुंभकर म्हणून तेजस आणि तारा यांचे देखील अनावरण झाले आहे.पुरुष आणि महिला यांची एकत्रितपणे होणारी ही स्पर्धा खो-खो खेळाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल यात काही शंका नाही. खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख सुधांशू मित्तल यांनी खो-खो हा खेळ ऑलम्पिक पर्यंत घेऊन जाण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.त्यामुळे या खेळाकडे शाळकरी मुलांसह तरुण वर्ग अजून आकर्षित होईल. भारताचा स्वतःचा असणारा हा खेळ जागतिक स्तरावर खेळला जात असल्याचा आनंद खो-खो प्रेमींमध्ये दिसून येत आहे.

कोपरगांव (गौरव डेंगळे): एकीकडे,तंत्रज्ञानाच्या मॉडेलचे प्रात्यक्षिक जे गणित आणि विज्ञानाच्या ज्ञानावर आधारित जीवन सोपे आणि सुरक्षित बनवते.विज्ञान मॉडेल्स वायू प्रदूषण,वाहतूक समस्या, पावसाचा अभाव,पर्यावरण संरक्षण,इत्यादी समस्यांवर उपायांची आशा निर्माण करत होते.मुली आणि शिक्षकांनी गणित आणि विज्ञान शिकवण्याच्या सोप्या पद्धती, खेळातून शिकणे,सेंद्रिय शेती आणि खते,हिंदी-इंग्रजी व्याकरण डझनभर मॉडेल्सवर चर्चा केली आणि मेळ्यात कारखान्यांमधून निघणारा धूर आणि चौकाचौकांवरील

वाहनांमधून निघणारा धूर कार्बनमुक्त करण्यासाठी,अंमली पदार्थांचे व्यसन आणि डोळ्यांच्या आजारांच्या समस्येला तोंड देण्यासाठी तक्ते तयार करून प्रदर्शित करण्यात आले.सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे शालेय स्तरावर गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये ३०० पेक्षा अधिक उपक्रम विद्यार्थ्यांनी तयार केले होते.इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा संदीप जगझाप व प्रा शेख हे होते. यावेळी शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे,उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी

ससाणे,सौ नैथलिन फर्नांडिस यांच्यासह गणित व विज्ञान विषयाचे सर्व शिक्षक तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.प्रा जगझाप म्हणाले की, आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती हा यशाचा मूळ मंत्र आहे.एखाद्या व्यक्तीला अपयशातून यशाचे चांगले मार्ग सापडतात.प्रा शेख यांनी प्रदर्शनात मुलांनी बनवलेल्या विविध प्रकल्पांचे कौतुक केले.

खंडाळा (गौरव डेंगळे): येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या थाटामाटात गावात संपन्न झाला. हा मेळावा सध्याचा नव्हे तर तब्बल वीस वर्षांपूर्वीच्या म्हणजेच सन २००३-०४ च्या बॅचचा होता.

२००३-०४ च्या दहावीच्या बॅचचा शालेय प्रवास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या वेगळ्या वेगळ्या वाटेला निघून गेले. यातील काही जण इंजिनियर झाले, काही जणांनी व्यवसाय सुरू केले तर काहीजण सामाजिक व राजनीतिक क्षेत्रामध्ये काम करायला लागले. काहींनी आपल्या वडिलोपार्जित शेती करायला सुरुवात केली. काळाच्या ओघात सर्वांची लग्न झाली मुलेबाळे झाली. मग त्यांचा शिक्षण, करियर व कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना २० वर्षे कसे भुरकून निघून गेले हे कोणाला समजले नाही. हे सर्व विद्यार्थी आज मेळाव्याच्या निमित्ताने शाळेत एकत्र आले.या मेळाव्याची सुरुवात जणू काही शाळाच भरली अशा पद्धतीने झाली.सर्व माजी विद्यार्थी पांढरा शर्ट घालून आले होते. सकाळच्या प्रार्थनेने व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात झाली.

यानंतर ज्यांनी अविरत असे ज्ञानदानाचे कार्य केलं अशा सर्व शिक्षक वृंदांचा यावेळी सत्कार करून भेटवस्तू त्यांना देण्यात आली. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांना भेट म्हणून एक झाड व पाण्याची बॉटल देण्यात आली.यावेळी शिक्षक

कडनोर जालिंदर,डहाळे संदीप,गोडे मधुकरराव,घोरपडे सूर्यभान,सौ शेलार प्रबोधिनी,सौ सदावर्ते शैलज,श्री रंधे,श्री फुंगे, सौ पालवे,श्री छलारे, सौ पवार,श्री आढाव,चव्हाण,शेलार राऊत,कवडे,सदावर्ते आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेप्रती असणारी आपुलकी म्हणून सन २००३-०४ च्या बॅचने शाळेच्या रंगरंगोटीसाठी ₹ २००००/- हजाराची देणगी शाळेला दिली. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

बेलापूर प्रतिनिधी-- गळनिंब तालुका श्रीरामपूर येथील खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर न घेण्याकरता मंडळ अधिकारी यांचे सहाय्यक यांनी दहा हजार रुपयाची मागणी केली याबाबतची तक्रार अहिल्यानगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे       याबाबत सविस्तर माहिती अशी की बेलापूर प्रभारी मंडळ अधिकारी मंडलिक यांचे सहाय्यक मदतनीस शहाजी वडीतके धंदा खाजगी मदतनीस मंडलाधिकारी यांनी गळलिंब येथील तक्रारदार यांनी खरेदी केलेली खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर न घेण्याकरता अर्ज दाखल केला सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलाधिकारी श्रीरामपूर अतिरिक्त कार्यभार बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडे सुरू होती या तक्रार अर्जाचा तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी मंडलाधिकारी कार्यालय येथे खाजगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी वडीतके यांनी मंडलाधिकारी मंडलिक यांचे करिता रुपये दहा हजार लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदार यांनी दिनांक 18 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांचेकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी शहाजी वडीतके खाजगी मदतनीस मंडळ अधिकारी बेलापूर याने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या हरकत अर्ज प्रकारचे निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मंडळ अधिकारी मंडलिक यांचे करिता रुपये दहा हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून आरोपी शहाजी वडीतके यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट पोलिस अमलदार सचिन सुद्रुक पोलीस अंमलदार गजानन गायकवाड पोलीस अंमलदार उमेश मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल हारुण शेख यांनी केली

कोपरगाव (गौरव डेंगळे):शैक्षणिक विश्वात मानाची असलेली पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा यंदा ११ आणि १२  रोजी कोपरगावात होणार आहे.सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल,कोपरगाव यांच्यातर्फे श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे ६ वे वर्ष आहे. ही स्पर्धा शालेय गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते.गटात २ स्पर्धक पाठविण्याची शाळेंना संधी आहे.ही स्पर्धा राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते.स्पर्धकांना नियोजित भाषणासाठी प्रत्येकी ५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धकांनी नियोजित आणि उत्स्फूर्त दोन्ही भाषणे करणे अपेक्षित आहे.स्पर्धेसाठीचे विषय पुढील प्रमाणे 

*Group A*-

1) Arise, Awake And Stop Not Till The Goal Is Reached. 

2) India – The Torch Bearer Of Spiritual Wisdom.

3) A Visionary Leader, Philanthropist – Shri Ratan Tata.

4) Where The Mind Is Without Fear – A Call For True Freedom.

*Group B*–

1) AI – A Devil In Disguise?

2) Climate Change – ‘A Call To Action’.

3) Excessive Pride In Race, Religion, Region – A Threat To Peace.

4) Freedom Need Guardians

वकृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना प्रथम क्रमांकास १०,०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास ७०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास ५०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र,चतुर्थ क्रमांकास ३०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र, पाचव्या क्रमांकास २०००/- रुपये मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि ५ उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००/- रुपये प्रमाणपत्र व मानचिन्ह पारितोषिक देण्यात येणार आहे.वकृत्व स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी सौ यास्मिन पठाण (9767786901) व सौ शिल्पा खांडेकर (9404612712) यांच्याशी संपर्क साधावा.पारितोषिक वितरण समारंभ १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडेल.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget